ETV Bharat / state

बीएचआर गैरव्यवहारातील मुख्य संशयित सुनील झंवरला अखेर अटक

author img

By

Published : Aug 10, 2021, 5:55 PM IST

Updated : Aug 10, 2021, 8:27 PM IST

बीएचआर पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी नोव्हेंबर 2020 मध्ये पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेळा अटक सत्र राबवून राज्यभरातून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सुनील झंवर
सुनील झंवर

जळगाव / नाशिक - राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला अखेर अटक झाली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (मंगळवारी) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास झंवर याला नाशिक येथून ताब्यात घेतले. गेल्या आठवडाभरापासून हे पथक त्याच्या मागावर होते. दरम्यान, बीएचआर प्रकरणात सुनील झंवरला झालेली अटक तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून, या प्रकरणात आता आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

बीएचआर गैरव्यवहारातील मुख्य संशयित सुनील झंवरला अखेर अटक

बीएचआर पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी नोव्हेंबर 2020 मध्ये पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेळा अटक सत्र राबवून राज्यभरातून संशयितांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पतसंस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे याला अटक झाली होती. आता मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला अटक झाली आहे. झंवर हा भाजपा नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे. त्याच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.

नाशकातून घेतले ताब्यात

सुनील झंवर याच्या अटकेसंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले, गेल्या आठवडाभरापासून एक विशेष पथक सुनील झंवर याच्या मागावर होते. त्याचे लोकेशन सातत्याने बदलत होते. तो अहमदाबाद येथून मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आला होता. त्यानंतर उज्जैन येथून नाशिकला आला. पोलिसांनी मंगळवारी सकाळी नाशिकच्या पंचवटी भागातून त्याला अटक केली, असे पोलीस उपायुक्त नवटके यांनी सांगितले. नाशकात झंवर नातेवाईकांकडे थांबला होता. मोबाईल लोकेशनवरून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचले. दरम्यान, नाशिक येथे असताना बंगल्याच्या गॅलरीत आल्यानंतर पोलिसांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याचे गुपचूप फोटो काढले. तो झंवर असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.

उद्या न्यायालयात हजर करणार

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सुनील झंवर हा बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे. त्याची अटक या प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण ठरू शकते. अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी होईल, त्यानंतर पोलीस पथक त्याला पुण्यात आणणार आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाईल, असे नवटके यांनी सांगितले.

मध्यंतरी न्यायालयाला आला होता शरण

मध्यंतरी सुनील झंवर हा पोलिसांना सापडत नव्हता. त्याला फरार करण्याची प्रक्रिया पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केली होती. तेव्हा झंवरने पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण येत अटक वॉरंट रद्द घेतले होते. त्यानंतर त्याला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला होता. तत्पूर्वी सुनील झंवरने मुंबई उच्च न्यायालयात 2 मार्च रोजी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याला 15 दिवसांचे अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच या 15 दिवसांच्या काळात पुणे न्यायालयातून अटकपूर्व जामीन घ्यावा, अशी सूचना केली होती. परंतु 15 दिवसांची मुदत संपल्यानंतरही झंवरने सेशन कोर्टातून जामीन न घेता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने झंवरला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर झंवरने अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत पुन्हा एकदा 15 दिवसांचे संरक्षण मागितले होते. मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळली होती.

काय आहे बीएचआर प्रकरण?

जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था ही एकेकाळी राज्यात नावाजलेली पतसंस्था होती. या पतसंस्थेच्या देशभरात विविध ठिकाणी शाखा आहेत. यातील जळगावातील मुख्य शाखेसह इतर शाखांमध्ये बेहिशेबी कर्जवाटप, आर्थिक अनियमितता तसेच ठेवीदारांची फसवणूक अशी प्रकरणे समोर आली होती. हे सुरू असल्याने पतसंस्था अवसायनात गेली होती. त्यामुळे 2015 मध्ये पतसंस्थेवर अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती झाली होती. कंडारे याने काही संचालक, बडे कर्जदार आणि इतर राजकीय मंडळीला हाताशी धरून, ठेवीदारांच्या ठेव पावत्यांच्या आधारे संस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता कवडीमोल भावात विक्री केली. यात सुमारे 1 हजार 200 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2020 मध्ये फिर्यादी रंजना घोरपडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तपासाची सूत्रे हलली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला. त्यात 27 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात छापे घातले. यात पहिल्याच दिवशी 5 संशयितांना अटक केली होती. 3 दिवसांच्या तपासानंतर बीएचआरच्या जळगावातील एमआयडीसी परिसरात असलेल्या मुख्य शाखेतून 2 ट्रक भरून कागदपत्रे, संगणक, हार्ड डिस्क असे ठोस पुरावे घेऊन पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले होते. यानंतर 22 जानेवारी 2021 रोजी मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज झंवर याला जळगावातून अटक झाली होती. अटक झालेल्या 6 जणांच्या विरोधात पुणे न्यायालयात 23 फेब्रुवारी 2021 रोजी पहिले दोषारोपपत्र दाखल झाले आहे. आता या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याच्यासह अवसायक जितेंद्र कंडारे हे अटकेत असून, त्यांच्या चौकशीत मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Last Updated : Aug 10, 2021, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.