ETV Bharat / state

कवयित्री बहिणाबाईंच्या माहेरात भीषण पाणीटंचाई; संतप्त ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण - vidharbh

असोदा गावासाठी २०१२ मध्ये ४ कोटी ९५ लाख रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली. मात्र, 8 वर्षांचा कालावधी उलटूनदेखील ही योजना पूर्ण झालेली नाही.

कवयित्री बहिणाबाईंच्या माहेरात भीषण पाणीटंचाई
author img

By

Published : May 21, 2019, 4:14 PM IST

जळगाव - खान्देशच्या ग्रामीण बोलीभाषेतील ओव्यांनी जीवनाचा सार अवघ्या जगाला सांगणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या जळगाव तालुक्यातील असोदा गावात सध्या भीषण पाणीटंचाई भासत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ उदभवल्याने संतप्त झालेल्या असोदा येथील ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या समोर उपोषण करत गावाची पाणीसमस्या निकाली काढण्याची मागणी केली. येत्या 8 दिवसात पाणीप्रश्न सुटला नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

कवयित्री बहिणाबाईंच्या माहेरात भीषण पाणीटंचाई

खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या असोदा गावाला गेल्या २५ ते ३० वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई भासत आहे. सुमारे ३५ हजार लोकसंख्येच्या असलेल्या असोदा गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आज परिस्थिती बिकट झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांना वणवण भटकंती करावी लागत आहे. गुरांच्या पाण्याचा प्रश्नही कठीण आहे. असोदा गावापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर तापी नदीवर शेळगाव मध्यम प्रकल्प आहे. परंतु, हा प्रकल्प अपूर्ण असल्याने असोदावासीयांची अवस्था 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी झाली आहे. सध्या गावात २५ ते ३० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, तो देखील अत्यंत दुषित असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढी भीषण परिस्थिती असताना जिल्हा परिषद प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

असोदा गावासाठी २०१२ मध्ये ४ कोटी ९५ लाख रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली. मात्र, 8 वर्षांचा कालावधी उलटूनदेखील ही योजना पूर्ण झालेली नाही. या योजनेच्या ठेकेदाराने अग्रीम रक्कम घेऊनही योजना पूर्ण केलेली नाही. २०१२ मध्ये तेव्हाची लोकसंख्या विचारात घेऊन योजना मंजूर झाली होती. मात्र, आता ८ वर्षांत गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही योजना आता पुरेशी ठरू शकत नाही. त्यामुळे शासनाने एखादी महत्त्वाकांक्षी योजना राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या -
- जुन्या सामुहिक पाणी योजनेचे कालबाह्य झालेले विद्युतपंप टंचाई निधीतून तातडीने बदलण्यात यावेत
- असोदा गावासाठी पाण्याचे इतर कोणत्या स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्रशासनाने गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा
- पूर्वीच्या योजनेच्या ठेकेदाराने बेकायदेशीरपणे अग्रीम रक्कम घेऊन योजनेचे काम पूर्ण केलेले नाही, त्यामुळे त्याच्याकडून अग्रीम रक्कम व्याजासह वसूल करावी.

Intro:जळगाव
खान्देशच्या ग्रामीण बोलीभाषेतील ओव्यांनी जीवनाचा सार अवघ्या जगाला सांगणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या जळगाव तालुक्यातील असोदा गावात सध्या भीषण पाणीटंचाई भासत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ उदभवल्याने संतप्त झालेल्या असोदा येथील ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या समोर उपोषण करत गावाची पाणीसमस्या निकाली काढण्याची मागणी केली. येत्या 8 दिवसात पाणीप्रश्न सुटला नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी दिला.

Body:खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या असोदा गावाला गेल्या 25 ते 30 वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई भासत आहे. सुमारे 35 हजार लोकसंख्येच्या असलेल्या असोदा गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आज परिस्थिती बिकट झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांना वणवण भटकंती करावी लागत आहे. गुरांच्या पाण्याचा प्रश्नही कठीण आहे. असोदा गावापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर तापी नदीवर शेळगाव मध्यम प्रकल्प आहे. परंतु, हा प्रकल्प अपूर्ण असल्याने असोदावासीयांची अवस्था 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी झाली आहे. सध्या गावात 25 ते 30 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, तो देखील अत्यंत दूषित असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढी भीषण परिस्थिती असताना जिल्हा परिषद प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

Conclusion:असोदा गावासाठी 2012 मध्ये 4 कोटी 95 लाख रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली. मात्र, 8 वर्षांचा कालावधी उलटून देखील ही योजना पूर्ण झालेली नाही. या योजनेच्या ठेकेदाराने अग्रीम रक्कम घेऊनही योजना पूर्ण केलेली नाही. 2012 मध्ये तेव्हाची लोकसंख्या विचारात घेऊन योजना मंजूर झाली होती. मात्र, आता 8 वर्षांत गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही योजना आता पुरेशी ठरू शकत नाही. त्यामुळे शासनाने एखादी महत्त्वाकांक्षी योजना राबवावी, अशी मागणी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या-

- जुन्या सामूहिक पाणी योजनेचे कालबाह्य झालेले विद्युत पंप टंचाई निधीतून तातडीने बदलण्यात यावेत
- असोदा गावासाठी पाण्याचे इतर कोणत्या स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्रशासनाने गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा
- पूर्वीच्या योजनेच्या ठेकेदाराने बेकायदेशीरपणे अग्रीम रक्कम घेऊन योजनेचे काम पूर्ण केलेले नाही, त्यामुळे त्याच्याकडून अग्रीम रक्कम व्याजासह वसूल करावी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.