ETV Bharat / state

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यातील 297 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

जळगाव जिल्हा रुग्णालयात आत्तापर्यंत कोरोना संशयित असलेल्या 394 रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 297 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 6 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, उर्वरित 89 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यातील 297 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह
दिलासादायक : जळगाव जिल्ह्यातील 297 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह
author img

By

Published : Apr 24, 2020, 2:38 PM IST

जळगाव - राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा रुग्णालयात आत्तापर्यंत कोरोना संशयित असलेल्या 394 रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 297 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 6 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित 89 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील 297 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

जळगाव जिल्हा रुग्णालयातील ओपीडी सेंटरमध्ये आजअखेर एकूण 4 हजार 733 संशयित रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शक्य त्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. परंतु, गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्याच्या शेजारील धुळे, नंदुरबार, बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावला. या संक्रमित जिल्ह्यातील नागरिक जळगावात दाखल झाल्याने इकडेही संसर्ग वाढत आहे. धुळे जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या अमळनेरात मागील आठवडाभरात 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील 2 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

अमळनेरातील कोरोना संसर्ग परिसर हा कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. शिवाय तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्ती जळगावात आल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी शुक्रवारी सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यात कृषी, फलोत्पादन तसेच त्याच्याशी संबंधित सर्व उपक्रम सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, बेकरी कारखाने, मिल्क प्रोसेसिंग प्लांटस, फ्लोअर मिल, डाळ मिल यांनाही परवानगी देण्यात आली आहे. व्यावसायिक व खासगी आस्थापनांमध्ये इलेक्ट्रॉनिक फॅनची दुकाने सुरू ठेवता येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.