ETV Bharat / state

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; खडसे-महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता - ncp shivsnea and bjp

2019 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले होते. याचीच भीती आताही शिवसेनेसह राष्ट्रवादीला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांची मनधरणी करण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशस्वी होतात का? हे देखील आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

खडसे-महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता
खडसे-महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता
author img

By

Published : Aug 30, 2021, 11:02 AM IST

Updated : Aug 30, 2021, 11:56 AM IST

जळगाव - जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्यासंदर्भात आज (सोमवारी) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी 4 वाजेनंतर अजिंठा शासकीय विश्रामगृहात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे. बऱ्याच दिवसांनी ही नेतेमंडळी एकत्र बैठकीला हजर राहणार आहे, ते खरंच हजर राहतील का? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले, भाजपचे तळ्यातमळ्यात!

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र लढण्यावर एकमत झाले आहे. मात्र, भाजपच्या भूमिकेबाबत साशंकता आहे. 2019 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले होते. याचीच भीती आताही शिवसेनेसह राष्ट्रवादीला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांची मनधरणी करण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशस्वी होतात का? हे देखील आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
पालकमंत्र्यांकडे सर्वपक्षीय पॅनलचे नेतृत्त्व-जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनलसाठी राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत. सर्वपक्षीय पॅनल व्हावे, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रयत्न करत आहेत. सर्वपक्षीय पॅनलचे नेतृत्व देखील त्यांच्याचकडे असणार आहे. त्यांना या कामी सहकार्य करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी यापूर्वी केलेली आहे. 2015 मध्ये पालकमंत्री असताना एकनाथ खडसे यांनी सर्वपक्षीय पॅनल गठीत केले होते. त्याच धर्तीवर आताही सर्वपक्षीय पॅनल असावे, असा खडसेंचा आग्रह आहे.काँग्रेसने दिलाय स्वबळाचा नारा-जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. आज होणार्‍या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत काँग्रेस नेते काय भूमिका मांडतात? याचीही उत्सुकता असेल. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी आजच्या बैठकीत झाली तर सर्वपक्षीय पॅनल गठीत होऊन जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या आजच्या बैठकीत इच्छुकांच्या नावांवरही चर्चा होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

Last Updated : Aug 30, 2021, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.