ETV Bharat / state

लॉकडाऊनचे उल्लंघन भोवले; चोपड्यातील 5 दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील 5 दुकान मालकांना नियमांचे उल्लंघन करमे चांगलेच भोवले आहे. नगरपालिका प्रशासनाने चौकशी करत या दुकान मालकांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे लॉकडाऊनच्या काळात चोरी-छुपे दुकाने उघडणाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Action taken against 5 shop owners in Jalgaon district for violating the rules

author img

By

Published : May 2, 2020, 3:46 PM IST

जळगाव - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लघंन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील 5 दुकान मालकांना नियमांचे उल्लंघन करणे चांगलेच भोवले आहे. नगरपालिका प्रशासनाने चौकशी करत या दुकान मालकांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे लॉकडाऊनच्या काळात चोरी-छुपे दुकाने उघडणाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन भोवले; चोपड्यातील 5 दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा भुसावळसह चोपडा तालुक्यातील अडावद येथे 43 कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा रेडझोनमध्ये आहे. असे असतानाही देखील चोपडा शहरातील काही दुकानदार बेफिकिरीने वागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील अनेक कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सर्रासपणे उघडून वस्तूंची खरेदी विक्री सुरू होती. काही दुकानदारांनी आपल्या दुकानांचे शटर अर्धे उघडून व्यवहार सुरू केले होते. अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची भीती असल्याने काही सुज्ञ नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी त्याची तातडीने दखल घेऊन 5 दुकानदारांवर कारवाई केली. त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. यापुढे जर लॉकडाऊनचे उल्लंघन केले तर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 तसेच भारतीय दंड संहिता 1860 कलम 180 तसेच इतर अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, अशा स्वरुपाच्या नोटीस देखील संबंधितांना बजावण्यात आल्या

या दुकानांवर झाली कारवाई -

मनीष कलेक्शन, अंबर रेडिमेड, श्रीकृष्ण होजिअरी, राम कलेक्शन, जवाहर स्टोर्स या 5 दुकान मालकांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नगरपालिका मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, स्वच्छता निरीक्षक व्ही. के. पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख राजेंद्र बाविस्कर, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.