ETV Bharat / state

धावत्या हावडा एक्सप्रेसला धडकला ट्रक; पाहा व्हिडिओ - धावत्या हावडा एक्सप्रेसला धडकला ट्रक

ज्या बोगीला ट्रक धडकला, त्या बोगीतील खिडकी आणि दरवाज्याजवळ बसलेले प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातानंतर काही मिनिटे एक्सप्रेस घटनास्थळी थांबून होती.

अपघात
अपघात
author img

By

Published : Apr 9, 2021, 7:05 PM IST

Updated : Apr 9, 2021, 7:38 PM IST

जळगाव - धरणगाव तालुक्यातील भोणे गावाजवळ धावत्या हावडा एक्सप्रेसला ट्रक धडकल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात एक्सप्रेसमधील 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने ट्रकच्या समोरील काही भागाचा एक्सप्रेसला स्पर्श झाल्यानंतर ट्रक दूर झाला. शिवाय एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला.

धावत्या हावडा एक्सप्रेसला धडकला ट्रक

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून (कोलकाता) हावडाकडे जाणारी अप 02833 क्रमांकाच्या हावडा एक्सप्रेसने सकाळी 9.45 वाजता अमळनेर स्थानक सोडले. त्यानंतर साधारण 10 वाजेच्या सुमारास एक्सप्रेस भोणे स्थानक पास करत होती. या स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याठिकाणी अप मार्गाच्या रुळाजवळ खडीने भरलेला एक ट्रक उभा होता. हा ट्रक रुळाच्या जवळच असल्याने एक्सप्रेसला त्याची धडक बसली. मोठा आवाज झाल्याने लोको पायलटने लगेचच एक्सप्रेस थांबवली.

3 ते 4 प्रवाशांना दुखापत

या अपघातात 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ज्या बोगीला ट्रक धडकला, त्या बोगीतील खिडकी आणि दरवाज्याजवळ बसलेले प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातानंतर काही मिनिटे एक्सप्रेस घटनास्थळी थांबून होती. त्यानंतर एक्सप्रेस पुढच्या प्रवासासाठी जळगावच्या दिशेने रवाना झाली.

कामगारांच्या चुकीमुळे घडला अपघात

हा अपघात कामगारांच्या चुकीमुळे घडला असल्याचे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे. जखमींवर रेल्वे प्रशासनाकडून प्रथमोपचार आले आहे. या घटनेनंतर अपघातग्रस्त ट्रक बुलडोझरच्या मदतीने अप मार्गाच्या रुळापासून दूर करण्यात आला.

हेही वाचा - VIDEO : एकदा बघाच! वर्दीत पोलिसांचा नागीन डान्स, तुफान व्हायरल..

Last Updated : Apr 9, 2021, 7:38 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.