ETV Bharat / state

जळगावमध्ये प्रतिदिन 10 टन लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा; रुग्णसंख्या वाढल्यास अनर्थ होण्याची भीती - जळगाव ऑक्सिजन तुटवडा

जिल्ह्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. जिल्ह्यासाठी दररोज 40 टन लिक्विड ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. पुरवठा मात्र फक्त 30 ते 35 टन होत आहे. अशा परिस्थितीत 8 ते 10 टन लिक्विड एवढ्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे.

जळगावात ऑक्सिजनचा तुटवडा
जळगावात ऑक्सिजनचा तुटवडा
author img

By

Published : Apr 21, 2021, 7:14 PM IST

Updated : Apr 21, 2021, 7:52 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. तसेच कोरोनाच्या अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 12 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. त्यात दीड हजारांवर रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर, तर 800 पेक्षा अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. एवढ्या रुग्णसंख्येसाठी दररोज जिल्ह्यात किमान 40 टन लिक्विड ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन गॅस साठवणूक करण्यासाठीची क्षमता 50 टनांची आहे. मात्र, जिल्ह्यासाठी दररोज केवळ 30 ते 35 टन लिक्विड एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत 8 ते 10 टन लिक्विड एवढ्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अनियंत्रित राहिल्यास अनर्थ होण्याची भीती आहे.

जिल्ह्यात दररोज 10 टन लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा
जिल्ह्यासाठी दररोज दोन टँकर आवश्यक

कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यासाठी दररोज दोन लिक्विड ऑक्सिजनचे टॅंकर मिळणे गरजेचे आहे. कृत्रिम ऑक्सिजनच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मुंबई व रायगड जिल्ह्यातील लिक्विड ऑक्सिजन उत्पादकांशी संपर्क साधला जात आहे. जिल्ह्यासाठी मुरबाड (कल्याण) तसेच तळोजा (रायगड) येथून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यासाठी उपलब्ध होणाऱ्या 30 ते 35 टन लिक्विड ऑक्सिजनपासून सुमारे साडेतीन हजार जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होते. रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेता हा साठा 24 तासात संपतो.

ऑक्सिजन काटकसरीने वापरण्याच्या सूचना

जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी कृत्रिम ऑक्सिजन उत्पादकांना केवळ आरोग्य यंत्रणेसाठी पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. औद्योगिक वापरासाठी सध्या पुरवठा थांबवण्यात आलेला आहे. तसेच, शासकीय व खासगी रुग्णालयांनी कृत्रिम ऑक्‍सिजनचा अगदी काटकसरीने वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

24 तासात उपलब्ध करावा लागतो लिक्विड ऑक्सिजन

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 20 किलोलीटर क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आला आहे. त्यात 24 तास पुरेल एवढा ऑक्सिजन साठा असतो. हा साठा संपण्याआधीच लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करावा लागतो. आतापर्यंत सुदैवाने आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली नाही. मात्र, जिल्ह्यातील जामनेर आणि मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात गेल्या आठवड्यात ऑक्सिजनचा साठा संपला होता. त्यामुळे तेथील ऑक्सिजन प्रणालीवर असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले होते. जामनेर येथे ऑक्सिजनचा साठा संपल्याने रुग्ण स्थलांतरित करताना एका महिलेचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - कोरोनामुळे शिखर शिंगणापूरची शंभू महादेव यात्रा रद्द

Last Updated : Apr 21, 2021, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.