ETV Bharat / state

सहा वर्षांच्या चिमुरड्याच्या जिद्दीपुढे हरला कोरोना! खेळणी, चॉकलेट-बिस्कीट देऊन मिळाला डिस्चार्ज

वेल्हाणे येथील एका सहा वर्षाच्या चिमुरड्यास कोरोनाची लागण झाली होती. मुंबई येथून कुटुंबासोबत गावी परत येताना नंदुरबार येथील चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्याच्यावर पारोळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते.

6 year girl cure from corona
6 वर्षाची मुलगी कोरोनामुक्त
author img

By

Published : Jun 2, 2020, 9:24 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र, अशा परिस्थितीत जिल्हावासीयांचे मनोबल वाढवणारी एक सुखद बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथील एका चिमुरड्याच्या जिद्दीपुढे कोरोनाने हार पत्करली आहे. मंगळवारी दुपारी या चिमुकल्याला स्थानिक प्रशासनाने खेळणी, चॉकलेट-बिस्कीट देऊन टाळ्यांच्या गजरात कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. पोटाचा गोळा घरी परतत असल्याचे पाहून चिमुरड्याच्या पालकांसह उपस्थित डॉक्टर्स, नर्स यांच्या डोळ्यातून यावेळी आनंदाश्रू वाहत होते.

वेल्हाणे येथील एका सहा वर्षाच्या चिमुरड्यास कोरोनाची लागण झाली होती. मुंबई येथून कुटुंबासोबत गावी परत येताना नंदुरबार येथील चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्याच्यावर पारोळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्याने त्यास मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. स्थानिक प्रशासनाने टाळ्या वाजवून, पुष्पवृष्टी करत, खेळणी आणि चॉकलेट-बिस्कीट देऊन त्याला पालकांसोबत घरी सोडले.

यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, डॉ. योगेश साळुंखे, डॉ. गिरीश जोशी, डॉ. चेतन महाजन, डॉ. निखिल बोरा, शहर तलाठी निशिकांत पाटील, म्हसवे तलाठी गौरव लांजेवार, डॉ. कुणाल पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित आणि त्याच्या पालकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. पारोळा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. मात्र, 23 मे रोजी डी. डी. नगर येथे पहिला कोरोना रुग्ण आढळला. यामुळे प्रशासन कामाला लागले. डॉक्टरांच्या रात्रंदिवस मेहनतीने व प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे मंगळवारी दुसरा रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.