ETV Bharat / state

भवरखेडा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर - रघुनाथ पाटील

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील भवरखेडा गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत देण्याचे आश्वासन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : Sep 26, 2019, 10:33 PM IST

Updated : Sep 26, 2019, 11:36 PM IST

जळगाव - शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली होती. या घटनेत ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत सरकारकडून केली जाईल, अशी घोषणा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

रघुनाथ दशरथ पाटील (वय 50 वर्षे), त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय 45 वर्षे), मोठी सून शोभा भागवत पाटील (वय 33 वर्षे), लहान सून लता उदय पाटील (वय 30 वर्षे) आणि कल्पना भैय्या पाटील (वय 35 वर्षे, सर्व रा. भवरखेडा, ता. धरणगाव) अशी या दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा - धक्कादायक: जळगावात ज्वारीची कापणी करताना ५ जणांवर कोसळली वीज

रघुनाथ पाटील यांच्या शेतात आज ज्वारी कापणीचे काम सुरू होते. सर्व जण काम करत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्व जण एका झाडाच्या खाली उभे होते. त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडा गावावर एकच शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस तसेच महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. ही दुर्घटना घडल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भवरखेडा शेतशिवारातील नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला. पुरामुळे घटनास्थळी पोहोचणे देखील मुश्किल झाले होते. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पाऊस ओसरला. त्यानंतर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांसह आजूबाजूच्या खेड्यांवरील ग्रामस्थांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती.

Intro:जळगाव
शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली होती. या घटनेत ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत शासनाकडून केली जाईल, अशी घोषणा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.Body:रघुनाथ दशरथ पाटील (वय 50), त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय 45), मोठी सून शोभा भागवत पाटील (वय 33), लहान सून लता उदय पाटील (वय 30) आणि कल्पना भैय्या पाटील (वय 35) सर्व रा. भवरखेडा, ता. धरणगाव) अशी या दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.

रघुनाथ पाटील यांच्या शेतात आज ज्वारी कापणीचे काम सुरू होते. सर्व जण काम करत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्व जण एका झाडाच्या खाली उभे होते. त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडा गावावर एकच शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती होताच धरणगाव पोलीस तसेच महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.ही दुर्घटना घडल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भवरखेडा शेतशिवारातील नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला. पुरामुळे घटनास्थळी पोहचणे देखील मुश्किल झाले होते. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला. त्यानंतर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.Conclusion:या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांसह आजूबाजूच्या खेड्यांवरील ग्रामस्थांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती.

बाईट : गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री
मोतीलाल पाटील, मयत पाटील कुटुंबीयांचे नातेवाईक
Last Updated : Sep 26, 2019, 11:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.