जळगाव - लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, अस बोललं जातं. याचाच प्रत्यय जळगावात आला. या लग्नात वर संदीप सपकाळे ( Sandeep Sapkale Hight ) हा ३६ इंच उंचीचा तर वधू उज्ज्वला ( Ujjwala hight ) ही ३१ इंच उंचीची आहे. या नवदांपत्यासोबत अनेकांना सेल्फी काढण्याचा मोहदेखील आवरता आला नाही. त्यामुळे जळगावात या ( Jalgaon Low Hight Couple Wedding ) लग्नाची चर्चा चांगलीच रंगत आहे.
दोघेही एकमेकांना अनुरूप - शनिपेठेतील चौगुले प्लॉट परिसरातील वर संदीप संजय सपकाळे हा शिक्षित असून, तो शहरातील एका नामांकित सुवर्णपेढीत कामाला आहे. तर वधू ही धुळ्याची आहे. या लग्नाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे या वधू आणि वराची उंची. ३६ इंच उंची असलेल्या संदीपला त्याची आयुष्याची साथीदार म्हणून ३१ इंची उज्ज्वला मिळाली आहे. सर्वसाधारण उंची असलेल्यांना देखील अनुरूप मुलगी वा मुलगा मिळणे अवघड जाते. त्यात कमी उंचीच्या वराला वा वधूला आपल्या उंचीच्या अनुरूप जोडीदार मिळणे अधिक अवघड असते. मात्र, संदीप व उज्ज्वला दोघेही एकमेकांना अनुरूप आहे. मुलगा संदीप याची उंची कमी असल्याने आम्ही अनेक वर्षांपासून गावोगावी फिरून मुलगी बघत होतो. मात्र, उंची कमी असल्याने त्याला मुलगी द्यायला कोणीच तयार होत नव्हते. मात्र शेवटी धुळे येथील मुलगी माझ्या मुलाला मिळाल्याने तिला मी माझ्या पोटच्या मुलीसारखी वागवेल, अशी प्रतिक्रिया संदीपच्या आईने व्यक्त केली.
दोघांचाही घरच्यांना चिंता - दोघांच्याही परिवारात सदस्य सर्वसाधारण उंचीचे संदीप हा परिवारात एकूलता आहे. त्याचे आई-वडील हे सर्वसाधारण उंचीचे आहेत. तर उज्ज्वलाला इतर तीन बहिणी व एक भाऊ आहे. आई-वडिलांसह तिचा भाऊ व बहिणी सर्वसाधारण उंचीचे आहे. त्यामुळे दोघांच्या परिवारात उज्ज्वला व संदीपच्या लग्नाची चिंता होती. मात्र, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात याचा प्रत्यय या लग्नाने उघड झाला. धडधाकड मुला-मुलींचे लग्न जमवताना देखील अनेक विघ्ने येतात. मात्र, संदीप व उज्ज्वला यांची लग्नगाठ अचानक जुळून आली. उज्ज्वलाचे वडील सीताराम कांबळे हे जळगावी आले असता त्यांना या स्थळाविषयी कळले होते. मात्र, त्यांना मुलगा काय करतो याबाबत काहीही माहित नव्हते. तीन वर्षांनंतर याच मुलाने उज्ज्वलाला मागणी घातल्याचे सांगितले. माझ्या उंचीची मुलगी मिळणे मुश्कील असतानाही मला मिळाली याचा मला आनंद आहे. मला मिळालेल्या उज्वला सोबत मी सुखाने संसार करून तिला व्यवस्थित ठेवणार, अशी प्रतिक्रिया नवरदेव संदीप यांनी दिली.
अखेर पार पडले लग्न - माझ्या पुतण्या च्या लग्नात इतकी नागरिकांनी उपस्थित राहून आशीर्वाद देण्यासाठी लग्नात उपस्थित दिली होती की, अक्षरशः आम्हाला लग्न हॉलदेखील कमी पडला तर माझा पुतण्या संदीप आणि उज्वला यांच्या अनोख्या लग्नाची जळगावात दिवसभर चर्चा असून होती. यामुळे अनेकांनी लग्न ठिकाणी उपस्थित राहून या नवदाम्पत्य सोबत सेल्फी देखीले काढून त्यांना आशीर्वाद दिले. नवरदेव 36 इंच आणि नवरी 31 इंचाची असल्याने जळगाव जिल्ह्यात या लग्नाची एकच चर्चा दिवसभर हर रंगत होती. सपकाळे परीवार गेल्या अनेक वर्षांपासून संदीपसाठी वधु शोधत होते. मात्र, अखेर त्यांची इच्छा पूर्ण होऊन संदीप ला त्याच्याच उंची इतकी मुलगी मिळाल्याने संदीप चा परिवार आनंदित आहे.
हेही वाचा - Dilip Walse Patil on Sameer Wankhede : 'समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे'