जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरूच असून, बुधवारी दिवसभरात पुन्हा 138 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3720 इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मंगळवारी एकाच दिवशी 10 जणांचा कोरोनाचे बळी गेल्यानंतर बुधवारी देखील 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 250 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 138 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक 39 पॉझिटिव्ह अहवाल हे जळगाव शहरातील रुग्णांचे आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण 6, भुसावळ 13, अमळनेर 7, चोपडा 11, पाचोरा 1, भडगाव 5, धरणगाव 1, यावल 13, एरंडोल 3, जामनेर 3, रावेर 10, पारोळा 5, चाळीसगाव 1, मुक्ताईनगर 1 आणि बोदवडमध्ये 19 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत.
हेही वाचा - 82 वर्षाच्या आजीची कोरोनावर मात; रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून दिल्या शुभेच्छा
जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 1271 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 163 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर आतापर्यंत 2199 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी 88 जणांना डिस्चार्ज मिळाला. चिंतेची बाब म्हणजे, बुधवारी 6 जणांचा मृत्यू झाला. त्यात चौघांचा मृत्यू कोविड रुग्णालयात, एकाचा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तर एकाचा अमळनेर येथे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये अमळनेर येथील 93 वर्षीय वृद्ध आणि 55 वर्षीय पुरुषाचा, मुक्ताईनगर येथील 25 वर्षीय तरुणाचा, धरणगाव येथील 55 वर्षीय महिला आणि 82 वर्षीय वृद्ध तसेच रावेर येथील 64 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
:कोरोना अपडेट-
जळगाव शहर 782
जळगाव ग्रामीण 125
अमळनेर 326
भुसावळ 432
चोपडा 254
पाचोरा 92
भडगाव 233
धरणगाव 159
यावल 197
एरंडोल 158
जामनेर 202
रावेर 268
पारोळा 228
चाळीसगाव 45
मुक्ताईनगर 40
बोदवड 79
एकूण 3720