ETV Bharat / state

हिंगोलीत युवक, विद्यार्थी काँग्रेसही उतरली रस्त्यावर.. दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन - youth congress

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अपशब्द वापरल्याने हिंगोलीत युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

Youths and  Student Congress protest
दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन
author img

By

Published : Dec 13, 2020, 5:35 PM IST

Updated : Dec 13, 2020, 6:27 PM IST

हिंगोली - दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अपशब्द वापरल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. याच वक्तव्याचा निषेध करीत हिंगोलीत युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले अन केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हिंगोलीत दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन
शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करून टाकावा, या मागणीसाठी आता युवक व विद्यार्थी काँग्रेसही रस्त्यावर उतरली आहे. या कायद्यामूळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होणार आहे. हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्या शेतकऱ्यांची साधी विचारपूस देखील केंद्र सरकारने केलेली नाही.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनाला चायना व पाकिस्तानचा हात असल्याचा अपशब्द वापरल्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळेच त्याचा निषेध म्हणून हिंगोली येथे युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला आहे. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या फोटोला आंदोलकांनी जोडे हाणून वक्तव्याचा निषेध केला आहे. आंदोलनामध्ये युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Last Updated : Dec 13, 2020, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.