ETV Bharat / state

धक्कादायक..! १८ वर्षीय पुतण्याचा ३७ वर्षीय चुलतीसोबत प्रेमविवाह - married

गेल्या २ ते ३ वर्षांपासून दोघांत प्रेमसंबंध होते. आज (रविवारी) त्यांनी ग्रामस्थांच्या साक्षीने मंदिरात लग्न केले. मातृत्व दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

१८ वर्षीय पुतण्याचा ३७ वर्षीय चुलतीसोबत प्रेमविवाह
author img

By

Published : May 12, 2019, 10:36 PM IST

Updated : May 13, 2019, 5:56 AM IST

हिंगोली - वसमत तालुक्यातील नाहद एका १८ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय चुलतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून दोघांत प्रेमसंबंध होते. आज (रविवारी) त्यांनी ग्रामस्थांच्या साक्षीने मंदिरात लग्न केले. मातृत्व दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

तरुण आणि त्याची चुलती गेल्या अनेक वर्षापासून कुटुंबासह शेतात वास्तव्यास आहेत. यातून पुतण्याचे ३७ वर्षीय चुलतीसोबत प्रेमसूत जुळले. लपून-छपून त्यांच्या गाठी-भेटी वाढत गेल्या. त्यांचीतील प्रेम प्रकरण एवढे रंगले की, त्यांनी प्रेमविवाह करण्याचे ठरवले. शेवटी त्यांनी गावातील मंदिरात जाऊन एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालत विवाह केला.

नात्याने दोघे चुलती-पुतणे असलेल्या या जोडप्याचे प्रेम संबंध गेल्या २-३ वर्षांपासून चांगलेच चर्चेत आलेले. चुलतीला २ अपत्येही असून नवरादेखील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याने विवाहाला संमती दिलीच कशी? यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. या दोघांचा प्रेमविवाह अचानक झाल्याने गावामध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोलीत मातृत्व दिनाच्या दिवशी  नात्याला काळीमा  फासली; ३७ वर्षीय चुलतीसोबत १८ वर्षीय पुतण्याचा प्रेम विवाह

हिंगोली- म्हणतात ना प्रेम हे वेड असत, असच एका चुलती पुतण्याचं हिंगोली जिल्ह्यात प्रेम उफाळलय अन त्यानी चक्क ग्रामस्थांच्या साक्षीने एका मंदिरात प्रेम विवाहही उरकलाय. मातृत्व दिनाच्या दिवशी घडलेल्या या अजब प्रकाराने जिल्ह्यात मात्र चर्चेला उधाण आले आहे.

 औंढा ना तालुक्यातील नाहद येथील एक १८ वर्षीय तरुण आणि नात्याने असलेली चुलती. हे अनेक दिवसांपासून आप आपल्या कुटुंबासह शेतातच वास्तव्यास होते. यातून पुतण्याचं  ३७ वर्षीय चुलती सोबत प्रेमसूत जुळले. चोरून लपून त्यांच्या गाठी भेटी वाढत गेल्या. त्यांचे हे प्रेम प्रकरण एवढे रंगले की, त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.  याचा शेवटच त्यानी गावातील  मंदिरात जाऊन प्रेमविवाह लावून केला. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालून एकमेकांना जीवनभर साथ द्यायचा मनोमन निश्चय केला. विशेष म्हणजे हे दोघेही शेजारीच राहतात. नात्याने दोघे चुलती - पुतणे असलेल्या या जोडप्याचे प्रेम संबंध गेल्या दोन तीन वर्षांपासून चांगलेच चर्चेत आलेले आहे. आज त्यांनी गावातील मंदिर गाठून लग्नाचा बारच उडवून टाकलाय. विशेष म्हणजे या या चुलतीला दोन अपत्येही असून नवरा देखील असल्याची माहिती समोर आलीय. मात्र त्याने विवाहाला संमती दिली च कशी ? यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत.  या दोघांचा प्रेमविवाह अचानक झाल्याने गावामध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे.
Last Updated : May 13, 2019, 5:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.