हिंगोली - सेनगाव तालुक्यातील सवना येथे एका 78 वर्षीय महिलेला रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली ( Hingoli Crime News ) आहे. स्वयंपाक करण्यास थोडा उशीर केल्याने हातपाय बांधून जाळल्याचे समोर आले ( Wife Burn Alive In Hingoli ) आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Hingoli Goregaon Police Register FIR ) आहे.
सुंदराबाई कुंडलिक नाईक, असे मयत आजीचे नाव आहे. तर कुंडलिक शिवराम नाईक असे आरोपीचे नाव आहे. कुंडलिक शिवराम नाईक यांना पाच मुली असून, त्यांची लग्न झाली आहेत. त्यामुळे पती-पत्नी दोघेच घरी राहत. कुंडलिक नाईक यांचा स्वभाव रागीट होता. स्वयंपाक करण्यास थोडा उशीर केल्याने कुंडलिक नाईक यांनी पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून दिले.
शेजाऱ्यांनी धूर येत असल्याचे पाहून घराकडे धाव घेतली. तेव्हा, सुंदराबाई नाईक या होरपळून गेल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षक श्रीदेवी पाटील, पोउपनी बाबुराव जाधव, राहुल गोटरे, गजानन बेडगे यांनी भेट दिली. तर याप्रकरणी शिरपूर जैन येथील जरिता वाघ यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक नाईक विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -Nitesh Rane : संभाजी राजेंचे उपोषण मराठा आरक्षणासाठी की खासदारकीसाठी - नितेश राणे