ETV Bharat / state

हिंगोली : वंचितच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षावर शिस्तभंगाची कारवाई

जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रभावती खंदारे  यांच्यावर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या सहीनिशी हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

वंचितच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षावर शिस्तभंगाची कारवाई
author img

By

Published : Sep 7, 2019, 3:04 AM IST

हिंगोली - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या वंचित बहु़जन आघाडीने राजकारणातील आपले स्थान निश्चित केले. मात्र, आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना वंचितची शिस्त पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रभावती खंदारे यांच्यावर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या सहीनिशी हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.

वंचित बहुजन आघाडी हिंगोलीच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रभावती खंदारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई

हेही वाचा - एमआयएम-वंचित आघाडीचा घटस्फोट; एमआयएमने मागितल्या होत्या ५० जागा

वसमत येथे ३० ऑगस्ट रोजी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी तर्फे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. मात्र मोर्चामध्ये बनवलेल्या फलकावर विरोधी पक्ष बहुजन क्रांती मोर्चाचे नाव छापले होते. तसेच याच फलकावर खंदारे यांनी यांच्या स्वतःच्या नावापुढे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष असे ही पद नमूद केले असल्याचे पत्रात नमूद केले आहे. तसेच या पूर्वी देखील खंदारे यांच्या अनेकदा तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावरूनच ही कारवाई केल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. एव्हढेच नव्हे तर खंदारे यांनी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा फलकावर नाव टाकू नये अशी सूचना दिली आहे.

हेही वाचा - 'वंचित'कडून एमआयएमला आठ जागांची ऑफर; एमआयएम-वंचित वेगळे लढणार?

यावर प्रभावती खंदारे म्हणतात , मी केवळ मोर्चाचे नेतृत्व केले होते, मोर्चासाठी जे बॅनर होते त्याचे अयोजन हे दुसऱ्याकडे होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी नेतृत्व स्वीकारले होते. तसेच मी नेहमीच माजी जिल्हाध्यक्ष हे वापरते.
मला बाळासाहेब यांचा जो काही आदेश आहे ते मान्य असल्याचे प्रभावती खंदारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. मात्र, या कारवाईने सध्या जिल्ह्यात कभी खुशी-कभी गम अशीच काहीशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. तर अचानक केलेल्या कारवाईमुळे जोरदार चर्चा रंगत आहे.

Intro:
'कभी खुशी कभी गम' जिल्ह्यात वातावरण

हिंगोली- सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची हवा असून, हिंगोली जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई केली. विषेश बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने असलेले पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हॉयरल होत आहे. पक्षाच्या या कारवाई मुळे मात्र जिल्ह्यात कभी खुशी कभी गम अशीच काहीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

Body:
प्रभावती खंदारे अस निलंबन केलेल्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षाचे नाव आहे. वसमत येथे 30 ऑगस्ट रोजी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी तर्फे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. मात्र काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये बनविलेल्या फलकावर विरोधक पक्ष बहुजन क्रांती मोर्चाचे नाव छापले. तसेच याच फलकावर खंदारे यांनी यांच्या स्वतःच्या नावापुढे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष असे ही पद नमूद केले असल्याचे पत्रात नमूद केले आहे. तसेच या पूर्वी देखील खंदारे यांच्या अनेकदा तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावरूनच ही कारवाई केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. एव्हढेच नव्हे तर सदरील खंदारे यांना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा फलकावर नाव टाकता कामा नये अशा स्पष्ट सूचना ही दिल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र निलंबन केलेल्या प्रभावती खंदारे म्हणतात की, मी केवळ मोर्चाचे नेतृत्व केलं होते मोर्चासाठी जे बॅनर होते त्याचे अयोजन हे दुसऱ्याकडे होते.कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी नेतृत्व स्वीकारलं. तसेच मी नेहमीच माजी जिल्हाध्यक्ष हे वापरते सर्व चुकीचे आहे. Conclusion:मला बाळासाहेब यांचा जो काही आदेश आहे हे मान्य असल्याचे प्रभावती खंदारे यांनी इटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. मात्र या कारवाईने सध्या जिल्ह्यात कभी खुशी कभी गम अशीच काहीशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. तर अचानक केलेल्या कारवाईमुळे जोरदार चर्चा रंगत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.