ETV Bharat / state

Hingoli Crime : भाचीची छेड काढल्याच्या रागातून मामाने केली युवकाची हत्या - हिंगोलीत तरुणाची हत्या

आपल्या भाचीची छेड काढल्या प्रकरणी मामाने धारदार शस्त्राने वार करुन युवकाची हत्या केली आहे. हिंगोली शहरातील तलाब कटा परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम राजे ( 23 ) असे मृत युवकाचे नाव आहे.

मृतक तरुण
मृतक तरुण
author img

By

Published : Apr 19, 2022, 7:18 PM IST

हिंगोली - भाचीला छेडणाऱ्या युवकाला मामाने अनेकदा समजावून सांगितले. मात्र काहीही परिणाम झाला नसल्याने, मामाने धारदार शस्त्राने वार करुन युवकाची हत्या केली आहे. हिंगोली शहरातील तलाब कटा परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम राजे ( 23 ) असे मृत युवकाचे नाव आहे. तर या प्रकरणी पोलीसांनी शोभा राजे यांच्या तक्रारीनुसार बबलू सुभाष धाबे, विशु, संतोष या तिघांवरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शुभम हा गेल्या काही दिवसांपासून तलाब कट्टा परिसरातील एका मुलीला छेडत असल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकाना मिळाली होती. त्यानुसार मुलीच्या मामामे शुभमला समजून सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र समजावून शुभमवर अजिबात परिणाम झाला नाही. यातूनच वाद वाढत गेला. याच वादातून सोमवारी रात्रीच्या सुमारास या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे व त्याच्यासोबत इतर दोघे जण रात्रीच्या सुमारास तलाबकटा परिसरात आले. त्यांनी एकत्र येत शुभमला तलाब कटा परिसरात बोलावून घेतले. त्याच्यावर थेट खंजीर, लोखंडी पाईपने वार करून गंभीर जखमी केले. यात शुभम हा जखमी अवस्थेत जाग्यावरच कोसळला. काही वेळातच युवकाचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Leopard Hunts Dog : अंधारात बिबट्याने कुत्र्याची 'अशी' केली शिकार, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.