ETV Bharat / state

बैलाने लाथ मारल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; मोहगाव येथील खळबळजनक घटना - gajanan bajali mane

वसमत तालुक्यातील मोहगाव येथे पोळ्यानिमित्त गावातून बैल फिरवत असताना बैलाने लाथ मारल्यामुळे एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. गजानन बालाजी माने (१२) असे मृत मुलाचे नाव आहे.

बैलाने लाथ मारल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू
author img

By

Published : Aug 30, 2019, 7:57 PM IST

हिंगोली - वसमत तालुक्यातील मोहगाव येथे पोळ्यानिमित्त गावातून बैल फिरवत असताना बैलाने लाथ मारल्यामुळे एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. गजानन बालाजी माने (१२) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बैलजोडी पोळा फुटल्यानंतर गावांमधील फिरवत असताना अचानक बैलाने गजाननला लाथ मारली. यामध्ये तो जागीच कोसळला. तात्काळ नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून गजाननला मृत घोषित केले.

पोळा हा शेतकऱ्याचा अगदी मोठा सण मानला जातो. मात्र, आज घडलेल्या घटनेमुळे मोहगावसह संपूर्ण जिल्हात शोककळा पसरली आहे. पोळा फुटल्यानंतर घरोघर फिरून आपल्या बैलजोडीला घास भरविला जातो. पण, ही घटना घडल्यानंतर कुणीही घरोघर बैलजोडी फिरवली नाही.

Intro:बैलाने लाथ मारल्याने पोळ्याच्या दिवशी बारा वर्षीय बालकाचा मृत्यू

हिंगोली- वसमत तालुक्यातील मोहगाव येथे पोळ्यानिमित्त गावातून बैल फिरवीत असताना एका बैलाने लाथ मारल्यामुळे एका 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

Body:गजानन बालाजी माने (१२) अस मयत बालकाच नाव आहे. गजानन ला अगदी लहानपणापासूनच गुरांची आवड आहे त्यामुळे तो नेहमीच गुरांच्या अवतीभवती राहत असे आज पोळा म्हटलं की सकाळपासूनच तो आपली बैलजोडी इतर बैल जोडी पेक्षा कशी उठून दिसेल यासाठी तो साज करत होता त्याने ते सात पूर्णही केला पण बैलजोडी पोळा फुटल्यानंतर गावांमधील फिरवत असताना अचानक बैलाने त्याला लाथ मारली यामध्ये तो जागीच कोसळला तात्काळ नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी तपासून गजाननला मयत घोषित केले. Conclusion:पोळा हा शेतकऱ्याचा अगदी मोठा सण मानला जातो या पोळ्यानिमित्त आगळेवेगळे उपक्रम बहुतांश शेतकरी राबवतात एवढेच नव्हे तर पोळ्यामध्ये आपली बैलजोडी इतर बैल जोडी पेक्षा कशी उठावदार दिसेल यासाठी मोठी कसही लावतात मात्र आज घडलेल्या घटनेमुळे मोहगाव सह संपूर्ण जिल्हा वरच शोककळा पसरली आहे. पोळा फुटल्यानंतर घरोघर फिरून आपल्या बैलजोडीला घास भरविला जातो मात्र ही घटना घडल्यानंतर कुणीही घरोघर बैलजोडी फिरवली नाही. आज अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने जरी हजेरी लावली असली तरीही ही गंभीर घटना घडल्यामुळे गावांमध्ये जराही आनंद उत्सव साजरा केला नाही.

फोटो मिळाला की पाठवतो
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.