ETV Bharat / state

चालत्या ट्रेलरमधून सहप्रवाशाला गाडी बाहेर फेकून चालकाचे पलायन

हिंगोली येथे शहापूर ते वसमत रोडवरील धार फाट्याजवळ एका अज्ञात व्यक्तीला ट्रेलरमधून फेकून देत चालकाने ट्रेलरसह पळ काढला होता. काही युवकांनी दुचाकीवरून ट्रेलरचा पाठलाग करत वाई गोरखनाथ येथे ट्रेलरला अडवले. ट्रेलर पोलीस ठाण्यात घेऊन जात असतानाच चालकाने ट्रेलर सोडून पळ काढला आहे.

author img

By

Published : Jul 27, 2019, 7:02 PM IST

चालत्या ट्रेलरमधून सहप्रवाशाला गाडी बाहेर फेकून चालकाचे पलायन

हिंगोली - मनमाड येथून नांदेडला पार्सल पोहोचविणाऱ्या ट्रेलरमधून शिरड-शहापूर ते वसमत रोडवरील धार फाटा येथील साई मंदिराजवळ सहप्रवाशाला गाडी बाहेर फेकून चालकाने पळ काढला आहे. याबद्दल औंढा पोलिसांना कळविताच पोलिसांनी शिरड येथे धाव घेतली. ट्रेलर पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना ट्रेलर चालकाने पळ काढला आहे.

शिरड-शहापूर पासून काही अंतरावरच एका ट्रेलरमधून एका व्यक्तीला फेकून देत असल्याचे दिसून आले. ही बाब रस्त्याच्या कडेला वास्तव्यास असलेल्या काही नागरिकांना समजताच त्यांनी शेजारील तरुणांना या बद्दल कळवले. तरुणांनी ट्रेलरचा पाठलाग करून वाई गोरखनाथ येथे ट्रेलरला पकडले. तोपर्यंत औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शिरड शहापूर येथे पोहोचले. ट्रेलरला औंढा येथे आणत असताना, चालकाने शिरड-शहापूर येथे रस्त्याच्या कडेला ट्रेलर उभे करून पळ काढला आहे. याप्रकरणी पोलीस ट्रेलर मालकासह चालकाचा शोध घेत आहेत. अज्ञात जखमी व्यक्तीवर औंढा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:
हिंगोली- मनमाडहुन नांदेड येथे पर्सल पोहोचविणाऱ्या चालत्या ट्रेलर मधुन शिरड शहापूर ते वसमत रोडवरील धार फाटा साई मंदिराजवळ एका अज्ञात व्यक्तीला फेकून देत ट्रेलर चालकाने ट्रेलर सह पळ काढला होता. ही बाब काही युवकाच्या लक्षात येताच त्यानी दुचाकीवरून पाठलाग करत वाई गोरखनाथ येथे ट्रेलर अडवले अन सदरील घटना ओंढा पोलिसांना कळविताच पोलिसांनी शिरड येथे धाव घेतली. ट्रेलर पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना ट्रेलर सोडून चालकाने पळ काढला. ओंढा पोलीस ट्रक मालकाचा शोध घेत आहेत.
Body:
शिरडशहापूर पासून काही अंतरावरच एका ट्रेलर मधून एका व्यक्तीला फेकून देत असल्याचे दिसून आले. ही बाब रस्त्याच्या कडेला वास्तव्यास असलेल्या काही नागरिकांना समजताच काही युवकांना घटना कळविली. तर दिपक रानमाळ यांच्या सह काही युवकांनी ट्रेलर चा पाठलाग करून वाई गोरखनाथ येथे ट्रेलर पकडले. तो पर्यंत ओंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शिरड शहापूर येथे पोहोचले. ट्रेलरल औंढा येथे वापस आणत असतांना, चालकाने शिरड शहापूर येथे रस्त्याच्या कडेला ट्रेलर उभे करून चालक फरार झाला आहे. या प्रकणी औंढा पोलीस ठाण्याचे पोनि कुंदनकुमार वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता. आम्ही ट्रेलर मालकासह चालकाचा ही शोध घेत असल्याचे सांगितले. तर
अज्ञात जखमी व्यक्तीवर औंढा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Conclusion:तर ट्रेलरवर असलेल्या संपर्क क्रमांकावर बाऱ्याच जणांनी संपर्क साधला असता त्यावर ट्रेलर वर केवळ एकच चालक आल्याचे सांगितले. अजून चालक अन मालकाचा पत्ताच लागलेला नसल्याने, नेमके त्या व्यक्तीला फेकण्याचे करणं काय असेल याचा अजून शोध लागलेला नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.