ETV Bharat / state

हिंगोलीत वाघाच्या दहशतीने भीतीचे वातावरण; पंजाचे ठसे पाहून शोध सुरू

वाघाने गेल्या ३ दिवसात सुकळी येथील ५ शेतकऱ्यांवर तर मन्नास पिंपरी परिसरातील एका हरणारावर हल्ला केला आहे. यामुळे आधीच पाण्याने त्रासलेल्या नागरिकांचा जीव वाघाच्या दहशतीने वेठीस आला आहे.

वाघाच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
author img

By

Published : Nov 3, 2019, 11:59 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात १० दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे तर ३ दिवसांपासून वाघाच्या दहशतीने गावकऱ्यांचा जीव वेठीस आला आहे. या दोन्ही संकटाने जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः भयभीत झाले आहेत. जनावरांवर हल्ला करणारा वाघ आता थेट माणसांवर हल्ला करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत वाढली आहे. या वाघाने सुकळी येथील ५ शेतकऱ्यांवर तर मन्नास पिंपरी परिसरातील एका हरणारावर हल्ला केला आहे. वनविभाग या वाघाच्या लहान सहान हालचालीवर लक्ष ठेवून असले तरी अजूनपर्यंत वाघाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र, पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या वाघामुळे वनविभागासह नागरिकांची झोप उडाली आहे.

वाघाच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जिल्ह्यात रात्री अपरात्री पाऊस हजेरी लावत असून दिवसा उघडीप देत आहे. त्यामुळे शेतकरी जमेल तशी भिजलेली सोयाबीन वाळवून टाकण्याचा प्रयत्न करीत असून पशुपालक आपली जनावरे नेहमीप्रमाणे जंगल परिसरात चरण्यासाठी नेत आहेत. मात्र गेल्या ३ दिवसांपासून दाखल झालेल्या वाघामुळे शेतकऱ्यांचे नियोजनच बिघडल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आल्याने बळीराजावर मोठे संकट ओढावले आहे. या दोन्हींचा सामना करता-करता जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

हेही वाचा - 'त्या' तरुणीचा खून गळा आवळून, ओळख पटली

पहिल्यांदाच हिंगोलीत दाखल झालेल्या वाघाच्या पाठीमागे वनविभागाचे कर्मचारी हात धुवून लागले आहेत. मात्र, ३ दिवस उलटून गेले असले तरी अजून वाघावर ताबा मिळविण्यात वनविभागाला यश आले नाही. हा वाघ दिवसेंदिवस आक्रमक होत चालला असून, आधी तो जनावरांवर हल्ला करायचा. मात्र, आता त्याने माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या वाघाला शोधण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्रामस्थ ही सरसावले आहेत. मात्र, हा वाघ दिवसेंदिवस जागा बदलत असल्यामुळे त्या त्या भागातील शेतकऱ्यांची चिंताही वाढत चालली आहे. यामुळे शेतावरील गुरे असुरक्षित आहेतच मात्र, त्याबरोबर गावात गोठ्यात बांधलेली जनावरेही असुरक्षित असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या प्रकरणी वनविभागाने तत्काळ या वाघाला ताब्यात घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा - निम्म्याहून अधिक भरलेल्या परभणीच्या येलदरी धरणाला गळती; परिसरात भीतीचे वातावरण

Intro:
हिंगोली- जिल्ह्यात दहा दिवसापासून पावसाने तर तीन दिवसांपासून वाघाने दहशद निर्माण केलीय. दोन्ही संकटाने जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः भयभीत झाले आहेत. जनावरांवर हल्ला करणारा वाघ आता थेट मानवावर हल्ला करीत असल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी मोठ्याप्रमाणात वाढलीय. सुकळी येथील पाच शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला केला तर मन्नास पिंपरी परिसरात एका हरणारावर हल्ला केलाय. त्यामुळे या भागात वाघाची दहशद वाढलीय. वनविभाग जरी या वाघाच्या लहान सहन हालचालीवर लक्ष ठेवत असले तरी आजू पर्यँत वाघाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या वाघामुळे मात्र विनविभागासह नागरिकांची झोप उडालीय.

Body:जिल्ह्यात पाऊस रात्री अप रात्री पाऊस हजेरी लावत असून दिवसा उघडदीप देत आहे. त्यामुळे शेतकरी जमेल तशी भिजलेली सोयाबीन वाळवून टाकण्याचा प्रयन्त करीत आहेत तर पशु पालक आपली गुरे नेहमी प्रमाणे जंगल परिसरात चरण्यासाठी नेत आहेत. मात्र तीन दिवसांपासून दाखल झालेल्या वाघामुळे शेतकऱ्यांचे नियोजनच बिघडत आहे. तर दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलंय. या दोन्हीचा सामना करता करता हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पहिल्यांदाच हिंगोलीत दाखल झालेल्या वाघाच्या पाठी माघे वनविभाचे कर्मचारी हात धावून लागले आहेत. तीन दिवस उलटून गेले असले तरी अजून तरी वाघावर ताबा मिळविता आलेला नाही. त्यामुळे वाघ हा दिवसेंदिवस आक्रमक होत चालला असून, गुरांचे तर फाडसे पडतच आहे, मात्र आता त्याने मानवावर हल्ला करण्यास सुरुवात केल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहे. वाघाला शोधण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यां सोबत ग्रामस्थ ही सरसावले आहेत. दिवसेंदिवस वाघ हा जागा बदलत चललाय, त्या मुळे त्या त्या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढतं चालली आहे.Conclusion:अजून किती दिवस वन विभाग या वाघाला असेच मुक्त ठेवणार आहे. शेतावरील गुरे ही असुरक्षित आहेतच आहेत गावात गोठयात बांधलेले गुरे ही असुरक्षित असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे वनविभागाने तत्काळ या वाघाला ताब्यात घेण्याची मागणी शेतकरी करीत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.