हिंगोली - जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. ट्रक अन टेम्पोच्या धडकेत तिघांचा जाग्यावरच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री बरा वाजताच्या सुमारास हिंगोली तालुक्यातील कलगावफाट्याजवळ घडली आहे. (Accident Incidents in Hingoli taluka) पवन शंकर गायकवाड (रा. नांदेड) मेहमूदखान (रा. सिपाहियोका मोहल्ला नागोर राजस्थान) तर, एका मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अणखी समजू शकले नाही. दरम्यान, घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
ट्रकमधील दोघे तर टेम्पो मधील एक जण जागीच ठार झाले
एक आयशीयर ट्रक वाशिमकडून नांदेड मार्गे मोसंबी घेऊन निघाला होता. दरम्यान, हिंगोली तालुक्यातील कलगाव फाट्याजवळ वाशिम मार्गे जाणाऱ्या आर जे 21 जी ए 55 32 या क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये ट्रकमधील दोघे तर टेम्पो मधील एक जण जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भयंकर होता की दोन्ही वाहनाचे समोरासमोर अतोनात नुकसान झालेले आहे मृतदेह ट्रक व टेम्पोचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले.
घटनास्थळी ग्रामीण पोलिस दाखल
अपघाताची माहिती कळताच पोलिस अधीक्षक राकेश कलासागर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनी कृष्णा मळघणे, उपनिरीक्षक मुपडे, विठ्ठल भडंगे, रविकांत हरकाळ, आकाश पंडीतकर, अशोक धामणे गजानन पोकळे यांनी धाव घेतली, तर अपघातात गंभीर जखमी असलेल्या एकास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले आहे. परंतु, त्या रुग्णांची देखील प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे.
रात्रीच बोलावली क्रेन त्यामुळे वाहतुक विस्कळीत टळली
या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी प्रसंगावधान राखत रात्रीच क्रेन बोलावून दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलवले तेव्हा कुठे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.
हेही वाचा - Budget Sessions : स्वतंत्र भारतातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रवास... एक नजर