ETV Bharat / state

हिंगोलीत वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू; बसच्या धडकेत १ तर ट्रकच्या धडकेत २ ठार

हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकची आणि हिंगोलीकडे येणाऱ्या दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. तर दुसऱ्या घटनेत पुसद आगाराच्या बसने दुचाकीला धडक दिली. या दोन्ही वेगवेगळ्या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : Jul 2, 2019, 7:40 PM IST

Updated : Jul 2, 2019, 8:48 PM IST

अपघातग्रस्त बस

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील मसोड फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. संजय मारोती काजळे (२८) आणि शिवम संजय काजळे (५, दोघेही रा. सलेगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या घटनेत बसने दिलेल्या धडकेत आकाश शिवाजी खंडेक (२७, रा. येडसी) नावाचा दुचाकीस्वार ठार झाला आहे.

हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकची (ए.पी. ०७, टी एच. ७४२९) आणि हिंगोलीकडे येणाऱ्या दुचाकीची (जी. जे. ९५, डी. आर. १९४०) समोरा-समोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती, की दुचाकीवरील काका-पुतण्या रस्त्यावर जोराने आदळले. दोघेही रक्तभांबळ झाल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. प्रवाशांच्या मदतीने दोघांना कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना तपासून मयत घोषित केले. घटनास्थळी कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा केला आहे. अजून या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तर दुसऱ्या घटनेत हिंगोली तालुक्यातील सिरसम. बु येथून काही अंतरावर पुसद आगाराची बस पुसदवरून हिंगोलीकडे येत असताना बसने दुचाकीला धडक दिली. यात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची रिप-रिप सुरू आहे. मागील २ दिवसांपूर्वी देखील याच रस्त्यावर आखाडा बाळापूर येथे अपघात झाला होता. या रस्त्यावर अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Intro:कळमनुरी तालुक्यातील मसोड फाट्या जवळ ट्रक अन दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. संजय मारोती काजळे(28) शिवम संजय काजळे((५) अशी मयताची नावे आहेत. तर दुसऱ्या घटनेत बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नाही.

Body:हिंगोली कडून नांदेड कडे जाणाऱ्या ए. पी. 07 टी एच. 7429 या क्रमांकाच्या ट्रकची अन हिंगोलीकडे येणाऱ्या जी. जे. 95 डी. आर. 1940 या क्रमांकाच्या दुचाकीची समोरा - समोर जोरात धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील दोघे बाप लेख रोडवर जोराने आदळले गेले. दोघेही रक्तभांबळ झाल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. प्रवाशांच्या मदतीने दोघांनाही कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले असता डॉक्टराने तपासून दोघांनाही मयत घोषित केले. या रस्त्यावर अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज दिवसभर जिल्हाभरात पावसाची रिप रिप सुरू आहे. मागील दोन दिवसांपूर्वी देखील याच रस्त्यावर आखाडा बाळापूर येथे अपघात झाला होता.

Conclusion:घटनास्थळी कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा केला आहे. अजून या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
तर दुसऱ्या घटनेत हिंगोली तालुक्यातील सिरसम बु येथून काही अंतरावर पुसद आगाराची बस पुसद वरून हिंगोली कडे येत असताना, बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. अद्याप सदरील मयताची ओळख पटलेली नाही. जिल्ह्यातील एकाच दिवशी अपघाताच्या दोन घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.

फोटो
ftp केले आहेत.

बस ने दिलेल्या धडकेत ठार झालेला मयत रस्त्यावर पडलेल्यावस्थेत

तर ट्रक अन
दुचाकी
या दोघा बाप लोकांची फोटो मिळाली नाहीत मिळताच देतो
Last Updated : Jul 2, 2019, 8:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.