ETV Bharat / state

हिगोंलीमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केले - stole ATM in Hingoli

वसमत शहरात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवुन नेल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. पळवून नेलेले एटीएम शहरापासून 2 किमी अंतरावर सापडले. त्या एटीएममध्ये 30 लाख 30 हजार 50 रुपये एवढी रक्कम होती.

चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केले
author img

By

Published : Sep 18, 2019, 4:45 PM IST

हिंगोली - वसमत येथील एटीएम चोरट्यांनी पळवून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एका चोरट्यास ताब्यात घेतले. तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी शहरापासून काही अंतरावर एटीएम आढळून आले.

चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केले

हेही वाचा - हिंगोलीत राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाची पक्षाला सोडचिठ्ठी, वंचितमध्ये प्रवेश

वसमत शहरात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवुन नेल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. पळवून नेलेले एटीएम शहरापासून 2 किमी अंतरावर सापडले. त्या एटीएममध्ये 30 लाख 30 हजार 50 रुपये एवढी रक्कम होती. एटीएम वसमत शहराच्या अतिवर्दळीच्या ठिकाणी असून ते चोरट्यांनी पळविले. चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएम न फुटल्याने, एटीएम मधील रक्कम वाचली. तर सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांपैकी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पोलिसाचाच अत्याचार; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

ताब्यात घेतलेल्या संशयित चोरट्याकडून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिक्षक रेडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र, या घटनेने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

Intro:वसमत येथील चोरट्यांनी चक्क एटीएमनेच पळून गेल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून एका चोरट्यास ताब्यात घेतले तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी शहरापासून काही अंतरावर एटीएम आढळून आले. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वसमत शहरात चक्क एटीएमच पळवून नेले जात असेल तर येथील सुरक्षेचे खरोखरच धिंडवडे उडल्यागत झालेय. मात्र अशाही परिस्थितीत चोरट्यांला बेड्या ठोकल्यामुळे पोलिसांची तत्परता दिसून आली.

Body:हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर हे सुरक्षिततेत्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील मानले जातेय. रात्रंदिवस या शहरांमध्ये उनाड टोळके तर पाकीट मारही राजरोसपणे फिरतात त्यामुळे या शहरात पोलिस अति बारकाईने लक्ष ठेवून राहतात. त्यामुळे हे शहर संवेदनशील मानले जाते. मात्र याच शहरात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवुन नेल्यामुळे चांगलीच खळबळ उडालीय. पळवून नेलेले एटीएम शहरापासून दोन किमी अंतरावर सापडले त्या एटीएम मध्ये तीस लाख तीस हजार पन्नास रुपये एवढी रक्कम होती. एटीएम वसमत शहराच्या अतिवर्दळीच्या ठिकाणी असून, ते पळविल्या गेले. चोरट्याने ते एटीएम फोडण्याचा खूप प्रयत्न केला मात्र एटीएम न फुटल्याने, एटीएम मधील 30 लाख 61 हजार 50 रुपयाची रक्कम बचावली. तर सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्या पैकी एकास तात्काळ ताब्यात घेतले.

Conclusion:एकंदरीत एटीएम अन संशयित आरोपी ताब्यात जरी घेतले असले तरीही एटीएमच पळवून नेल्यामूळे संवेदनशील शहरात सुरक्षितता कशी असेल ? हे वेगळ्या शब्दात सांगायकगी गरज नाही. सध्या हिंगोलीचे पोलीस प्रशासन वेगवेगळ्या कारणाम्यामुळे चांगलेच चर्चेत आलेय. तर या घटनेने मात्र चांगलीच खळबळ उडालीय. ताब्यात घेतलेल्या संशयित चोरट्यांकडून मोठी टोळी उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक रेडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र या घटनेने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झालीय.

बाईट- पोनि उदयसिंह खंडेराय
व्हिज्युअल

ftp केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.