ETV Bharat / state

भूकंपाने हादरला हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यात केंद्र बिंदू, ४.४ तीव्रतेची नोंद - Earthquake in Hingoli district

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात आज (११ जुलै)ला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा धक्का आतापर्यंतच्या जाणवलेल्या धक्क्यापैकी सर्वाधिक जास्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर, तसेच औंढा नागनाथ आणि हिंगोली तालुक्यातील काही गावांमध्ये सकाळी ८.४५ वाजता हे धक्के जाणवले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
author img

By

Published : Jul 11, 2021, 10:20 AM IST

Updated : Jul 11, 2021, 12:44 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील वसमत, औढा नागनाथ तालुका आज (रविवारी) सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टरस्केलवर ४.४ इतक्या तीव्रतेची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील वसमत औंढा नागनाथ तालुक्यात नेहमीच अधून-मधून भूकंपाचे धक्के जाणवतात. आज (११ जुलै)ला जाणवलेला धक्का आतापर्यंतच्या जाणवलेल्या धक्क्यापैकी सर्वाधिक जास्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर, तसेच औंढा नागनाथ आणि हिंगोली तालुक्यातील काही गावांमध्ये या भूकंपाचे हादरे जाणवले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाेल आहे.

'आजच्या भूकंपाचा सर्वाधिक जास्त आवाज'

वसमत औंढा नागनाथ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. हे या भागातील ग्रामस्थांसाठी नेहमीच होऊन बसले. मात्र, आज जाणवलेल्या भूकंपाचा अनेक भागात आवाज आलाय. त्यामुळे ग्रामस्थांनी आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. दरम्यान, आजपर्यंत झालेल्या भूकंपेक्षा आजच्या भूकंपाचा सर्वाधिक जास्त आवाज आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. अजून तरी या भूकंपाची कुठेही नोंद झालेली नाही.

'भूगर्भ शास्त्रज्ञांनी अनेकदा केली पाहणी'

नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या पांगरा शिंदे परिसरात व वसमत तालुक्यातील काही भागांमध्ये भूगर्भ शास्त्रज्ञांनी मागील दोन वर्षांपूर्वी पाहणी केली होती. मात्र, या पाहणीतून अजून तरी काही स्पष्ट झाले नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

या भागात जाणवले हादरे

औंढा नागनाथ व वसमत तालुक्यातील विविध गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये पिंपळदरीसह विविध भागात व कुरुंदा आमदरी पांगरा शिंदे, मेथा, कोथळज अनेक गावात धक्के जांवले आहेत. मात्र, पांगरा शिंदेव येथे आज दोन हादरे जाणवले आहेत. तर, हिंगोली शहरात ही अनेक भागात धक्के जाणवले आहेत. मागील चार वर्षापासून जमिनीतून गुड आवाज येण्याचे सत्र सुरूच आहे. मात्र, प्रशासन यावर काहीच बोलायला तयार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासन माणसाचे जीव जाण्याची वाट बघत आहे काय? असा प्रश्न आता ग्रामस्थ करत आहेत.

'जमिनीत पाणी असल्याने जाणवत आहेत भूकंपाचे हादरे बसतात'

दोन वर्षांपूर्वी स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठामार्फत वारंवार भूगर्भातून आवाज देणाऱ्या जमिनीची शास्त्रज्ञांमार्फत पाहणी केली होती. त्यावेळी जमिनीमध्ये पाणी असल्याने अशाप्रकारे हादरे जाणवत असल्याचे, आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, आज झालेल्या या धक्क्याची भूमापक केंद्रावर आणखी कोणतीही नोंद झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

'भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील साधूनगर'

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औढा नागनाथ तालुक्यात आज (रविवारी) सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे सेंटर यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील साधूनगर येथे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील साधूनगर भागामध्ये भूकंपाचे धक्के जानवल्याची माहिती समोर आली आहे. हा भूकंप 4.4 रिश्‍टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता अशीही माहिती आहे. आज सकाळी आठ वाजून 33 मिनिटांनी हे धक्के जाणवले असून या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील साधूनगर येथे असल्याचे (National Center For Seismology) नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजी या संकेतस्थळावरून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

'आजूबाजूच्या पाच ते सहा गावी जाऊन नुकसानीची घेणार माहिती'

या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी महागावचे तहसीलदार इसाळकर, नायब तहसीलदार व आपत्ती निवारण पथक यांना घटनास्थळी जाऊन या भागात कुठे नुकसान झाले का? कुठे धक्के जाणवले का? याची माहिती घेण्यास पाठविण्यात आले असल्याचे सांगितले.
ही टीम साधूनगर व आजूबाजूच्या पाच ते सहा गावी जाऊन नुकसानीची माहिती घेत आहे. या भूकंपाबाबद्दल अधिकृत माहिती एक तासानी सांगण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बोलताना सांगितले. दरम्यान, महागाव तालुक्यातील साधुनगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांशी संपर्क साधला असता, या भागात कुठल्याच प्रकारचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले नसल्याची माहिती दिली.

Last Updated : Jul 11, 2021, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.