ETV Bharat / state

'त्या' तरुणीचा खून गळा आवळून, ओळख पटली - शारदा बेलसरे खून न्यूज

शारदा मांगीलाल बेलसरे (रा. धामणी ता. अचलपूर जि. अमरावती) असे या मृत तरुणीचे नाव आहे. शारदा ही अभियंता असलेल्या आपल्या प्रियकरासोबत १८ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे गेली असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली होती. त्यानंतर हत्ता परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावाच्या पाण्यात शारदाचा मृतदेह आढळला आहे.

'त्या' तरुणीचा खुन गळा आवळून, ओळख पटली
author img

By

Published : Nov 3, 2019, 12:55 AM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा परिसरात तलावात फेकून दिलेल्या तरुणीची ओळख पटली असून, सदर तरुणी अमरावती जिल्ह्यातील धामणी येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रेम प्रकरणातून या तरुणीचा गळा आवळून खून झाला असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून गोळीबार, वकिलांनी केली वाहनांची जाळपोळ

शारदा मांगीलाल बेलसरे (रा. धामणी ता. अचलपूर जि. अमरावती) असे या मृत तरुणीचे नाव आहे. शारदा ही अभियंता असलेल्या आपल्या प्रियकरासोबत १८ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे गेली असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली होती. त्यानंतर हत्ता परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावाच्या पाण्यात शारदाचा मृतदेह आढळला आहे.

सदर तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर सेनगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी कोणताही पुरावा न सापडल्याने या मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते. मात्र, तपास अधिकारी सपोनि बाबुराव जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मृतदेहाचे फोटो व सविस्तर माहिती व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केले.

पोलिसांच्या या प्रयत्नांना अवघ्या चोवीस तासाच्या आत यश आले. मृत तरुणी ही अमरावती जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी सेनगाव पोलिसांशी संपर्क साधला. तरुणीचा खून गळा आवळून केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.

Intro:

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा परिसरात तलावात फेकून दिलेल्या तरुणीची ओळख पटली असून, सदर तरुणी अमरावती जिल्ह्यातील धामणी येथील असल्याचे स्पष्ट झालेय.अन तिचा गलावळून खून केल्याचे समोर आलंय. प्रेम प्रकरणातूनच हा खून झाल्याचे ही स्पष्ट झाले आहे. आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Body:शारदा मांगीलाल बेलसरे रा. धामणी ता. अचलपूर जि. अमरावती अस मयत तरुणीच नाव आहे. ही तरुणी इंजिनिअर असलेल्या प्रियकरासोबत १८ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे गेली असल्याची माहिती नातेवाइकांनी दिलीय. हत्ता परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावाच्या पाण्यात सदर तरूणीचा मृतदेह खून करून फेकून दिला होता. मृतदेह शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही वाटसरूच्या लक्षात आली होती. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना कळताच कर्मचाऱ्यांने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला अन मृतदेह शेवविच्छेदयासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. अन तपासाची चक्रे फिरवण्यासाठी प्रयत्न केले.मारेकऱ्यांने घटनास्थळी कोणताही पुरवा सोडला नव्हता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे हे सेनगाव पोलिसांसमोर आवाहनच होते. आशा परिस्थितीत तपास अधिकारी सपोनि बाबुराव जाधब यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शना नुसार मयत तरुणीच्या मृतदेहाचे फोटो व सविस्तर माहिती व्हॉट्सप च्या माध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली. पोलिसांच्या या प्रयत्नांना अवघ्या 2चोवीस तासाच्या आत प्रयत्नाला यश आले. मयत तरुणी ही अमरावती जिल्ह्यातील असल्याचे समोर आलंय. तरुणीच्या नातेवाइकांनी सेनगाव पोलिसांशी संपर्क साधला अन आमच्या मुलीचाच मृतदेह असल्याची माहिती दिली. अन ही इंजिनिअर आलेल्या प्रियकरासोबत निघून गेल्याची माहिती सोपोनि जाधव यांना दिली. तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे शेवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. Conclusion:आता नेमका खून कशासाठी आणि कोणी केला याचा शोध सेनगाव पोलीस घेत आहेत. प्रियकर हा इंजिनिअर असल्याने लवकरच खुनाचा उलगडा होईल असे तपास अधिकारी जाधव यांनी संगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.