ETV Bharat / state

पाच मिनिटं उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना हाकलले शाळेच्या बाहेर, शिक्षण विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

शाळेत येण्यास पाच मिनिटं उशीर झाल्याने शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर हाकलून शाळेच्या गेटला कुलूप लावले. त्यामुळे हिंगोलीत शिक्षण विभागाचे दार शाळेच्या वेळेत कुलूपबंद असल्याचे पाहवयास मिळाले.

hingoli
पाच मिनिटं उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना हाकलले शाळेच्या बाहेर
author img

By

Published : Dec 11, 2019, 4:32 PM IST

हिंगोली - मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. अशाच परिस्थितीत ५ मिनिटं उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने शाळेच्या बाहेर हाकलून देत मुख्य गेटला कुलूप लावण्याचा खळबळजनक प्रकार हिंगोली शहरातील आदर्श विद्यालयात घडला आहे.

पाच मिनिटं उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना हाकलले शाळेच्या बाहेर

हिंगोली येथील आदर्श विद्यालयात थंडीच्या दिवसात अवघे ५ मिनिटं उशीर झाल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चक्क शाळेच्या बाहेर हाकलून देत मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप लावून घेतले. त्यामुळे हिंगोलीत शिक्षण विभागाचे दार शाळेच्या वेळेत कुलूपबंद असल्याचे पाहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने शाळेबाहेर हाकलून दिल्याचे खुद्द शिक्षकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - हिंगोलीतील 'त्या' मच्छिमाराचा मृत्यू विद्युत वितरणच्या हलगर्जीपणामुळेच

दिवसेंदिवस शिक्षण विभागात एवढा आलबेल कारभार सुरू असून याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना हाकलून देताना काही रस्त्यावरील नागरिकांनी शिक्षकांना जाब विचारला. मात्र, या विद्यार्थ्यांच्या उशिरा येण्याने शाळेची शिस्त बिघडते असे शिक्षकानी त्या वाटसरूला उत्तर दिले. हा भयंकर प्रकार शिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे गुरुवारी पहाटे -पहाटे शिक्षण क्षेत्रात या प्रकाराने खलबळ चांगलीच उडाली. चक्क शाळेचे दारच बंद केले गेल्यामुळे सर्वसामान्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

आदर्श विद्यालय अन महाविद्यालय हे दोन्ही नेहमीच वेगवेगळ्या करणाने चर्चेत राहते. त्यामुळे या प्रकरणांमध्ये शिक्षण विभाग किती गांभीर्याने लक्ष घालतो. संबधीत शाळेच्या शिक्षकांसह मुख्याध्यापकावर काय कारवाई करण्यात येईल, की नेहमीप्रमाणे खुलासा मागवून या विद्यालयाची पाठराखण केली जाईल हे देखील पाहणे आता रंजक ठरणार आहे.

हेही वाचा - हिंगोलीत महिलांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेचा 'तु्म्ही हाक द्या, मी साथ देईन' उपक्रम

Intro:
शिक्षण विभागाच्या कारवाईकडे लागले सर्वांचे लक्ष

हिंगोली- मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे अशाच परिस्थितीत पाच मिनीट उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर हाकलून देत शिक्षकाने मुख्य गेटला कुलुप लावण्याचा खळबळजनक प्रकार हिंगोली शहरातील आदर्श विद्यालयात घडला आहे.

Body:म्हणतात ना शिक्षणाचे दार हे सदैव उघडेच असते मात्र हिंगोली येथील आदर्श विद्यालयात थंडीच्या दिवसात अवघा पाच मिनीट उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना चक्क शाळेच्या बाहेर हाकलून देत मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप लावून घेतले त्यामुळे हिंगोलीत शिक्षण विभागाचे दार शाळेच्या वेळेत कुलूप बंद असल्याचे पहावयास मिळाले एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने शाळे बाहेर हाकलून दिल्याचे खुद शिक्षकांनी देखील चांगले आहे. दिवसेंदिवस शिक्षण विभागात एवढा आलबेल कारभार सुरू आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना हाकलून देताना काही रस्त्यावरील नागरिकांनी शिक्षकांना जाब विचारला मात्र या विद्यार्थ्यांच्या उशिरा येण्याने शाळेची शिस्त बिघडते असे त्या शिक्षकाने वाटसरूला उत्तर दिले. हा भयंकर प्रकार शिक्षणाधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे आज पहाटे -पहाटे शिक्षण क्षेत्रात या प्रकाराने खलबळ चांगलीच उडालीय. चक्क शाळेचे दारच बंद केले गेल्यामुळे सर्वसामान्यातून संताप व्यक्त केला जात आहे. असे ही आदर्श विद्यालय अन महाविद्यालय हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

Conclusion:असेही नेहमीच वेगवेगळ्या करणाने चर्चेत राहतेय. आता या प्रकरणांमध्ये शिक्षण विभाग किती गांभीर्याने लक्ष घालून संबधीत शाळेच्या शिक्षकांसह मुख्याध्यापकावर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे का नेहमीप्रमाणे खुलासा मागवून या विद्यालयाची पाठराखण करतेय हे देखील पाहणे आता रंजक ठरणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.