हिंगोली - अगोदर कोरोनामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. आशा परिस्थिती शेतकऱ्यांना धीर देणे गरजेचे असताना शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिली येथे आंदोलन केले. मात्र, त्यांच्यावर करण्यात आलेल्या अश्रूधुराचा मारा, पोलिसांनी दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ हिंगोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
केंद्रातील भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांविरोधी करण्यात आलेल्या कायद्याने संताप व्यक्त केला जात आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हेच डोळ्यासमोर ठेऊन मोठा मोर्चा काढला आहे. अन् हेच सरकार त्या शेतकऱ्यांना अजूनही त्रास देत सुटले आहे. शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्लीदरबारी निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे सोडले, तर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अजूनही त्रास देण्याचा आतोनात प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच हिंगोलीत ही शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
या संघटना झाल्या आक्रमक
काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, क्रांती सेना, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधी चौक येथे तर इतर संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपा सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली