ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील काही भाग कंटेनमेंट झोन घोषित

हिंगोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील काही क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. याठिकाणी अत्यावश्यक सेवा प्रशानाकडून पुरवण्यात येतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली
author img

By

Published : May 25, 2020, 9:54 AM IST

हिंगोली- जिल्ह्यातील काही भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा इतरत्र प्रादूर्भाव होवू नये, यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील काही भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.

या कंटेनमेंट झोनमध्ये हिंगोली शहरी भागातील सिध्दार्थ नगर-जवळा पळशी रोडची डावी बाजू, बागवानपूरा-तलाब कट्टा मस्जीदच्या पाठीमागे आणि गुहा चौक-पेन्शनपूरा या भागाचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात हिंगोली तालूक्यातील बासंबा, खंडाळा, इंचा, वडद, माळसेलु, लिंबाळा, गंगानगर (कारवाडी ग्रामपंचायत क्षेत्र) आणि आनंदनगर (बळसोंड ग्रामपंचायत क्षेत्र) तर सेनगाव तालुक्यातील माझोड, बरडा, खुडज आणि सुरजखेडा ही गावे कंटेनमेंट झोनमध्ये आहेत.

या कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधन घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड सहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.