ETV Bharat / state

'साहेब! आमच्या तोंडाला पीक आलंय, लाईन तोडली, आता आम्ही काय खावं?' टरबूज उत्पादक शेतकऱ्यानं हुंदके देत मांडली व्यथा - msedcl

महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्याने मुळे यांना टरबुजाला पाणी देता येत नाही. उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचा पुरवठा नसल्याने टरबुजाच्या वेली आता सुकू लागल्यात.

टरबूज उत्पादक शेतकऱ्यानं हुंदके देत मांडली व्यथा

author img

By

Published : Feb 14, 2021, 2:32 PM IST

हिंगोली : वीजबिलांसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर रबीची पिके कशी वाचवायची असा यक्षप्रश्न आता उभा राहिला आहे. विहिरीत पाणी असूनही वीजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. हिंगोलीतील एका टरबूज उत्पादक शेतकऱ्याने तर अक्षरशः हुंदके देत आपली व्यथा मांडली आहे.
वीज पुरवठा तोडल्याने सुकल्या टरबुजांच्या वेली
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील श्रीरंग फालाजी मुळे यांनी त्यांच्याकडील जवळपास दीड एकर शेतात टरबुजाची लागवड केली आहे. लागवडीपासून नियोजनाने मेहनत करून त्यांनी शेती फुलविली. चांगल्या नियोजनामुळे नुकतेच वेलींना टरबुज लागायला सुरूवात झाली होती. फळधारणा आणि वाढीच्या अवस्थेत पिकाची पाण्याची गरज वाढते. अशा परिस्थितीत पाण्याचेही योग्य नियोजन त्यांनी केले होते. मात्र अशातच महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्याने मुळे यांना टरबुजाला पाणी देता येत नाही. उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचा पुरवठा नसल्याने टरबुजाच्या वेली आता सुकू लागल्यात. त्यामुळे मुळे कुटुंबियांवर हे सुल्तानी संकटच कोसळल्याचे दिसून येत आहे.

वीज पुरवठा खंडीत केल्याने टरबुजाच्या वेली सुकत आहेत

आता आम्ही काय खावं?

टरबुज लागवडीपासून ते आतापर्यंत 60 हजारांचा खर्च मुळे यांनी केला आहे. वेलींना होणाऱ्या फळधारणेतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा त्यांना होती. उत्पन्न हाती आल्यानंतर डोक्यावर असलेल्या कर्जातून काही अंशी तरी मुक्तता मिळेल अशी आशा मुळे कुटुंबियांना होती. मात्र महावितरणच्या तुघलकी निर्णयामुळे त्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या सुल्तानी संकटामुळे हतबल झालेल्या मुळे यांनी 'साहेब! आमच्या तोंडाला पीक आलंय, लाईन तोडली, आता आम्ही काय खावं?' अशा शब्दांत आपली व्यथा मांडली आहे.

हेही वाचा - चळेगावात शेतकऱ्यांचे महावितरणविरोधात आंदोलन; प्रवीण दरेकर यांचा पाठिंबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.