हिंगोली - कोरोनाची खबरदारी घेत मोठ्या उत्साहात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. सलग तिसऱ्यांदा सरपंच पदाचे दोन वेळा आरक्षण सुटल्यानंतर आता दुसऱ्यांदा सोडलेले आरक्षण हे कायम राहिले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हे सरपंच निवडीकडे लागले आहे. 8 ते 17 फेब्रुवारी या कालावधी सरपंच, उपसरपंचाची निवड होणार असून , जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यासंदर्भात सर्वच तहसीलदारांना आदेश देऊन, निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांची निवड केली आहे.
हेही वाचा - भंडारा : बावनथडी धरणाच्या नहराचे पाणी शेतात गेल्याने शेतीचे नुकसान
कोरोना महामारीच्या संकटांना तोंड देत, प्रशासनाने खबरदारी घेऊन, हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. अशाच परिस्थितीत निवडणुकीपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण देखील सोडले होते. परंतु, शासनाने राज्यातील जाहीर झालेले सरपंच आरक्षण रद्द करून निवडणुका झाल्यानंतर परत सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. त्यामुळे आता सरपंच पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता 8,10, 11, 12, 15 आणि 17 फेब्रुवारी या कालावधीत सरपंच पदाची निवडणूक होणार आहे.
पीठासीन अधिकाऱ्यांची केली निवड
नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच-उपसरपंच पदासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1998 चे कलम 33 (1 व 2) अन्वय याध्यासी अधिकारी यांची निवड करण्यात आलेली आहे. दिलेल्या कालावधीत सरपंच उपसरपंच निवड होणार आहे.
हेही वाचा - बीड : ठेकेदाराकडून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी