ETV Bharat / state

धक्कादायक..! हिंगोली जिल्ह्यात फेसबुक लाईव्ह करून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न - suicide attempt live on facebook hingoli

सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे एका युवकाने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाचे प्राण वाचले असून पोलीस खरोखरच जनतेसाठी 24 तास सेवेत असल्याचे दिसून आले.

संतोष वाठोरे
संतोष वाठोरे
author img

By

Published : Aug 26, 2020, 12:30 PM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे एका युवकाने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पत्रकार मनीष खरात यांनी हा प्रकार फेसबुकवर पाहताच पोलिसांना याबाबत माहिती कळवली आणि युवकाशी संवाद साधत त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ सुत्रे हलवत, संबधित परिसरातील पोलीस पथक आणि नागरिकांना घटनास्थळी पाठवत युवकाला आत्महत्या करण्यापासून थांबवले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाचे प्राण वाचले असून पोलीस खरोखरच जनतेसाठी 24 तास सेवेत असल्याचे दिसून आले.

संतोष वाठोरे (30), असे त्या युवकाचे नाव आहे. संतोष मागील दोन-तीन दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. त्याने आज सकाळी फेसबुकवर 'सॉरी मित्रांनो, आता सर्व काही संपलं, असा मेसेज टाकला. फेसबुक लाईव्हमध्ये तो रडताना दिसत होता. दरम्यान, त्याचा फेसबुक मित्र असलेल्या मनीष खरात यांनी फेसबुक लिंकवरून सदरील मित्राला बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो 'काही नाही हो सर, आता सर्व काही जे आहे, ते फेसबुक लाईव्हमध्ये थोड्यावेळात बघा' असे तो म्हणाला.

मनिष खरात यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिवसांब घेवारे यांच्याशी संपर्क साधून, याबाबत माहिती दिली. घेवारे यांनी क्षणाचा ही विलंब न करता, युवकांचे लोकेशन ट्रेस केले. तसेच अजून काही मित्राला फोन करून, त्याचा शोध घेण्यास सांगितले आणि स्वत: घटनास्थळाकडे रवाना झाले. तेवढ्यात पोलिसांचे गतिमान पथक घटनास्थळी पोहचले.

घेवारे यांनी अवघ्या 15 मिनिटात हे ऑपरेशन यशस्वी केले. घेवारे यांनी काही मित्राला आत्महत्या करणाऱ्या युवकाजवळ पाठवून त्या युवकाला आत्महत्येपासून परावृत्त केले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे हिंगोली पोलीस प्रशासनाचे कौतुक होता आहे, तर युवकाच्या नातेवाईकांनी मनीष खरातसह पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.