ETV Bharat / state

नागरिकत्व विधेयकाच्या निषेधार्थ औंढा येथे रास्ता रोको, मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल औंढाचा पुढाकार

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ औंढा नागनाध येथे मुस्लिम नमाइंदा कौन्सिल औढाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

rasta-roko-agitation-was-launched-in-oudha-to-protest-the-citizenship-bill
नागरिकत्व विधेयकाच्या निषेधार्थ औंढा येथे रास्ता रोको
author img

By

Published : Dec 16, 2019, 5:30 PM IST

हिंगोली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ औंढा नागनाथ येथे मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल औंढाच्या वतीने जिंतूर टि पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विधेयक हे एका समुदायाला डोळ्यासमोर ठेवून केले असल्याचा आरोप मुस्लिम बांधवांनी केला आहे. विधेयकाला राष्ट्रपतींनी अजिबात मंजुरी देऊ नये, अन्यथा सरकारविरोधात असहयोग आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम बांधवांनी दिला आहे.

नागरिकत्व विधेयकाच्या निषेधार्थ औंढा येथे रास्ता रोको

मुस्लिम बांधवाने केलेल्या रास्ता रोको मुळे औंढा -औरंगाबाद, औंढा-नांदेड, औंढा-हिंगोली या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घोषणाबाजीने संपूर्ण परिसरच दणाणून गेला होता. आंदोलन स्थळी हट्टा पोलिस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे व औंढा ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. औंढानागनाथ शहरांमधून मुस्लिम बांधव रस्ता रोकोसाठी जिंतूर पॉईंटकडे जात असताना एम आय एम संघटनेचे शहराध्यक्ष अजू इनामदार यांनी बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या मानव विकासच्या बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. एमआयएमचे शहराध्यक्षाना तातडीने पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा रस्ता रोको मौलाना आमीन राही यांच्या नेतृत्वाखाली केला गेला. विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी वाय बी खान व पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना दिले. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसमत येथे ही मोर्चा -

नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात वसमत येथेही मुस्लिम बांधवांच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये विविध संघटना तसेच समाजबांधव सहभागी झाले होते. सरकारविरोधात देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. यावेळीही मोठा पोलिस बंदोबस्त होता.

Intro:
*मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल औंढा यांचा पुढाकार*

हिंगोली- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ औंढा नागनाथ येथे मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल औंढाच्या वतीने जिंतूर टि पॉईंट येथे रास्ता रोको केला. विधायक हे एका समुदायाच्या डोळ्यासमोर ठेवून केले असल्याचा आरोप मुस्लिम बांधवांनी केलाय. विध्येयकास राष्ट्रपतींनी अजिबात मंजुरी देऊ नये, अन्यथा सरकारविरोधात असहयोग आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम बांधवाने दिलाय.

Body:मुस्लिम बांधवाने केलेल्या रास्ता रोको मुळे
औंढा -औरंगाबाद, औंढा- नांदेड, औंढा- हिंगोली या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर घोषणाबाजीने संपूर्ण परिसरच दणाणून गेला होता. आंदोलन स्थळी हट्टा पोलिस स्टेशनचे सपोनि गजानन मोरे व औंढा ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी धाव घेतली व कडक बंदोबस्त ठेवला होता. तसेच औंढानागनाथ शहरांमधून मुस्लिम बांधव हे रास्ता रोको जिंतूर पॉईंटकडे जात असताना एम आय एम संघटनेचे शहराध्यक्ष अजू इनामदार यांनी बस स्थानक मध्ये उभ्या असलेल्या मानव विकास च्या बसवर दगड फेक केली. या मध्ये बसच्या काचा फुटल्या असून, या प्रकाराने एकच खळबळ उडालीय. एमआयएमचे शहराध्यक्ष यांना तातडीने पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा रस्ता रोको मौलाना आमीन राही यांच्या नेतृत्वाखाली केला गेला. विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी वाय बी खान व पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना दिले. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Conclusion:*वसमत येथे ही काढला मोर्चा*

नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात वसमत येथेही मुस्लिम बांधवांच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वसमत येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये विविध संघटना तसेच समाजबांधव सहभागी झाले होते सरकारविरोधात देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले. यावेळीही मोठा पोलिस बंदोबस्त होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.