ETV Bharat / state

चालू कुलरमध्ये पाणी टाकणे बेतले जीवावर; विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू - जमीन

चालू कुलरमध्ये पाणी घालताना शॉक लागून हिंगोलीत एकाचा मृत्यू झाला.

चालू कुलरमध्ये पाणी घालताना शॉक लागून एकाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 3, 2019, 5:14 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात ३ ते ४ दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. जवळपास ४२ अंश एवढे तापमान असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांचा मोठा खटाटोप सुरू आहे. अशातच घरात कुलर असेल आणि ते व्यवस्थित न हाताळल्यास जीव गमावू शकतो. असेच एकाला चालू कुलरमध्ये पाणी टाकणे जीवावर बेतले. शॉक लागलेली व्यक्ती काही क्षणात जमिनीवर कोसळून पडली. त्या व्यक्तीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. ज्ञानेश्वर भाऊराव कोळपे (३५, रा. कळमनुरी) असे मृताचे नाव आहे.

चालू कुलरमध्ये पाणी घालताना शॉक लागून एकाचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्याचे तापमान ३ ते ४ दिवसांपासून ४२ अंशावर पोहोचले आहे. मे महिन्यात वाढणारा पारा एप्रिलमध्येच वाढत आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यावरच सर्वाधिक जास्त भर आहे. असाच एक विश्वहिंदु परिषदेचा कार्यकर्ता दिवसभर आपले काम उरकून रात्री घरी गेला. घरात गेल्यानंतर लेकरं बाळ झोपलेले असताना काही प्रमाणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे ज्ञानेश्वर कुलर जवळ गेला तर कुलरमध्ये पाणी कमी दिसले.

कुलरला शॉक बसत असल्याची पत्नीने कल्पना दिली होती. मात्र, त्याच्याकडे ज्ञानेश्वरने दुर्लक्ष करून चालू कुलरमध्येच पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. यातच त्याला विजेचा धक्का लागला अन् ज्ञानेश्वर जोराने जमिनीवर कोसळला. त्यानंतर पत्नीने आरडाओरड केल्याने नागरिकांनी धावाधाव केली आणि ज्ञानेश्वरला लगेच रुग्णालयात नेले. दरम्यान, डॉक्टरांनी तपासून ज्ञानेश्वरला मृत घोषित केले.

ज्ञानेश्वर हा सामाजिक कार्यक्षेत्रात सक्रिय कार्यकर्ता होता. त्याच्या मृत्यूवर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे जो तो त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, ज्ञानेश्वरच्या मृत्यूने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. जवळपास ४२ अंश एवढे तापमान असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांचा मोठा खटाटोप सुरू आहे. अशातच घरात कुलर असेल अन ते व्यवस्थित न हाताळल्यास जीव गमावू शकतो. असेच एका जणाला चालू कुलर मध्ये पाणी टाकणे जीवावर बेतले. शॉक लागलेली व्यक्ती काही क्षणात जमिनीवर कोसळून पडली. रुग्णालयात नेले तर डॉक्टरानी तपासून मयत घोषित केले. ज्ञानेश्वर भाऊराव कोळपे (35) रा. कळमनुरी असे मयताचे नाव आहे.

Body:तीन ते चार दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याचे तापमान ४२ अंशावर पोहोचले आहे. उन्हामध्ये जराही गेले तर चटके लागत आहेत. मे महिन्यात वाढणारा पारा एप्रिल मध्येच वाढत आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यावरच सर्वाधिक जास्त भर आहे. असाच एक विश्वहिंदु परिषदेचा कार्यकरत दिवसभर आपले काम उरकुन रात्री घरी गेला. घरात गेल्यानंतर लेकरं बाळ झोपलेले असताना, काही प्रमाणात उकाडा जाणत होता. त्यामुळे न्यानेश्वर कुलर जवळ गेला तर कुलर मध्ये पाणी कमी दिसले. तर कुलर शॉक मारत असल्याची पत्नीने कल्पना दिली होती. मात्र त्याच्याकडे न्यानेश्वरने दुर्लक्ष करून त्यचालू कुलर मध्येच पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. यातच शॉक लागला अन न्यानेश्वर जोराने जमिनीवर कोसळला. पत्नीने आरडा ओरड केली नागरिकांनी धावा धाव केली अन लगेच रुग्णालयात नेले तर डॉक्टराने तपासून न्यानेश्वर ला मयत घोषित केले.

Conclusion:न्यानेश्वर हा सामाजिक कार्यक्षेत्रात सक्रिय कार्यकर्ता होता. त्याच्या मृत्यू वर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे जो तो त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होता. न्यानेश्वरच्या मृत्यूने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.