ETV Bharat / state

हिंगोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाचा मृत्यू; कारण अस्पष्ट

जिल्ह्यातील एकांबा गावातील मुंबईवरुन आलेल्या युवकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

one man in hingoli civil hospital reason not confirmed
हिंगोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाचा मृत्यू; कारण अस्पष्ट
author img

By

Published : Apr 22, 2020, 9:02 AM IST

हिंगोली- मुंबईवरून महिनाभरापूर्वी गावी परतलेल्या एका जणाचा हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अजून तरी कळू शकले नाही. मात्र, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. परंतु, जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने मंगळवारी हिंगोली ग्रीन झोनमध्ये आला होता. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, या युवकाच्या मृत्युमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात भीतीचे वतावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील एकांबा येथील एका युवकाला ताप आल्याने तो 20 एप्रिल रोजी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. डॉक्टराने तपासणी करून औषधोपचार केल्यानंतर तो घरी परतला मात्र ताप कमी झाला नाही म्हणून, तो परत स्वतःहून हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी साठी गेला असता, डॉक्टरांनी त्याची तपासणी केली अन त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले. त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळच्या वेळी त्याचा मृत्यू झाला.

युवकाचा अचानक मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला. जिल्ह्यात एक कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण बरा होऊन गेला तेव्हापासून एक ही कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने, हिंगोली जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर झाला होता. मात्र, या युवकाच्या मृत्युमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

विशेष म्हणजे रुग्णालयातून नातेवाईककडे मृत्यूदेह दिला जात नसल्याने, एकांबा या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, मृत व्यक्ती हा मंत्रालयात कार्यरत होता, तो मुंबई वरून परतला तेव्हा पासून घरातच अलगीकरण कक्षात राहत होता. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच युवकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.