ETV Bharat / state

अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला, मजुराचा जागीच मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातील घोळवा येथे नांदेड रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : Apr 9, 2019, 10:35 PM IST

मृत लक्ष्मण वानोळे

हिंगोली - घोळवा येथे नांदेड रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण तुकाराम वानोळे (२०, रा. घोळवा ता. कळमनुरी) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. आज सायंकाळी एक टॅक्ट्रर (एमएच ३८ व्ही १३३०) अवैध वाळू घेवून माळेगावकडे येत होता. या ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये लक्ष्मण बसला होता. घोळवा पाटीजवळ हा ट्रॅक्टर आल्यानंतर अचानक पलटी झाला. यावेळी ट्रॅक्टरखाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फौजदार श्रीराम जामगे, पोलीस हवालदार सय्यद अली यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

दिवसेंदिवस वाळूची वाहतूक वाढल्याने रात्री अपरात्री वाळूची वाहतूक सुरू आहे. पथकाच्या भीतीने वाळू माफीयांवाले सुसाट वाहने पळवत आहेत. अशाच परिस्थितीत हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील घोळवा येथे नांदेड रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्याने त्यातील एका मजूराचा जाग्यावरच मृत्यूझाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण तुकाराम वानोळे असे मयताचे नाव आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात मोठ्याप्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. टॅक्टर क्र. एमएच ३८ व्ही १३३० हे अवैध वाळू घेवून माळेगावकडे येत होते. त्यात मयत लक्ष्मण तुकाराम वानोळे (२०, रा. घोळवा ता. कळमनुरी)हा ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये बसला होता. आचानका घोळवा पाटीजवळ ट्रॅक्टर पलटी झाले. ट्रॅक्टरखाली दबून लक्ष्मण याचा जागीच मृत्य झाला. घटनेची माहिती मिळताच फौजदार श्रीराम जामगे, पोहेका सय्यद अली यांनी घटनास्थळी धमव घेतली. घटनेचा पंचनामा केला. आजही अवैध वाळू माफिया प्रशासनाची नजर चुकवत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत आहेत.Conclusion:दिवसेंदिवस वाळूची वाहतूक वाढल्याने रात्री अपरात्री वाळूची वाहतूक सुरू आहे. पथकाच्या भीती पोटी वाळू माफी सुसाट वाहने पळवीत आहेत. अशाच परिस्थितीत हा अपघात घडला. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.