हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयात एका कोरोना संशयित रुग्णाला दाखल करण्यात आले. आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केलेल्या या रुग्णाचे वय 54 वर्षे आहे.
संशयितामध्ये कोरोची लक्षणे आढळल्याने त्याला पुढील तपासणीसाठी आयसोलेशेन वार्डमध्ये ठेवण्यात आले आले आहे. सद्यस्थितीत या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्याचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनुभवी वैद्यकीय अधिकऱ्यांच्या टीममार्फत या रुग्णावर औषधोपचार सुरू आहेत.
सध्या हिंगोलीतील घरातच कोरेंटाईन केलेल्यांची संख्या सहा आहे. ज्यांना आपल्या घरीच कॉरेंटाईन केले आहे, त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत तयार केलेल्या रॅपिड रिसपॉन्स टीम आणि पोलीस प्रशासनामार्फत दररोज पाठपुरावा करण्यात येत आहे.