हिंगोली- हिंगोलीवरून रिसोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या अपघातात एक वयोवृद्ध महिला जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित वयोवृद्ध महिला जावयासोबत लेकीला भेटण्यासठी जात होती. दुचाकीवरून रिसोडमार्गे जात असताना अचानक ब्रेक मारल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली वयोवृद्ध महिला रस्त्यावर जोरात पडली. ही घटना सेनगाव तालुक्यातील तळणी फाट्यावर घडली आहे.यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर मार लागला अन अति रक्तस्राव झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नरसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, बराच वेळ झाला तरी रुग्णवाहिका दाखल झालेली नव्हती. त्यामुळे अडीच ते तीन तासापासून महिलेचा मृतदेह घटनास्थळीच पडून होता.
संचारबंदीच्या काळात ही वयोवृद्ध महिला कुठे जात होती? याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही. तर अचानक घडलेल्या घटनेने जावई हा पूर्णपणे गोंधळून गेला होता.