ETV Bharat / state

...अखेर खासदार हेमंत पाटलांनी नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी

खासदार हेमंत पाटील हे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून जिल्ह्यात फिरकले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडीयावरून मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. अखेत त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील काही भागात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

पाहणी करताना खा. हेमंत पाटील
author img

By

Published : Nov 6, 2019, 11:43 PM IST

हिंगोली - खासदार हेमंत पाटील हे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून जिल्ह्यात फिरकले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. एवढेच नव्हे तर ते हरवल्याची तक्रार देखील पोलीस अधीक्षकांकडे केली होती. मात्र, आज (बुधवार) खासदारांनी हिंगोली जिल्ह्यात धाव घेऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून दिल्या शिवाय मी अजिबात स्वस्थ बसणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हिंगोली जिल्ह्यात सलग नऊ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासन स्तरावर जरी पंचनामे सुरू असले तरी ही खासदार हेमंत पाटील शेकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात कुठे ही फिरले नसल्याने, नागरिक व शेतकऱ्यांतून नाराजीचा सुर निघत होता. मात्र, आज खासदार हेमंत पाटील यांनी सेनगाव व कळमनुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बळीराजाला जास्तीत जास्त मदत मिळून देण्याचा आश्वासनही दिला. सोबत कळमनुरीचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्यासह तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती. तर प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना ही दिल्या.

वसमत तालुक्यातील बोराळा, धामणगाव, नागेशवाडी तर औंढा नागनाथ तालुक्यातील जलालधाबा सेनगाव तालुक्यातील कपडसिंगी,बरडा, पिंपरी, बन, घोरदडी, वझर, सुकळी, मकोडी, धानोरा या गावाना भेटी देऊन बांधावर धाव घेऊन शेतकऱ्यांशी सवांद साधला.

25 हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी मागणी केली. तर शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून शासनच्या माध्यमातूनही मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खा.पाटील यांनी सांगितले. एकंदरीत खासदार आज नुकसानग्रस्त भागात फिरले असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, ते ऐनवेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आले नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी नाराज झाले होते. एवढेच काय तर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांनी खासदार हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. या तक्रारीच्या बातम्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याच्या धमकीच्या पोस्ट ही हिंगोली आणि नांदेड दोन्ही जिल्ह्यांत व्हॉट्सअॅप ग्रुपवर नांदेड येथून फिरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर आता शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळेल या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Intro:

हिंगोली- लोकसभेचे खासदार हेमंत पाटील हे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा पासून जिल्ह्यात फिरकले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडिया, फेसबुक, वाटसप वरून मोठ्याप्रमाणात टीका केली जात होती.एवढेच नव्हे तर ते हरवल्याची तक्रार देखील पोलीस अध्यक्षकांकडे केली होती. मात्र आज खासदाराने हिंगोली जिल्ह्यात धाव घेऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केलीय.अन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून दिल्या शिवाय मी अजिबात स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले.

Body:हिंगोली जिल्ह्यात सलग नऊ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणा मुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासन स्तरावर जरी पंचनामे सुरू असले तरी ही लोकप्रिय खासदार हेमंत पाटील शेकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात कुठे ही फिरले नसल्याने, नागरिक व शेतकऱ्यांतुन नाराजीचा सुर निघत होता. मात्र आज खासदार हेमंत पाटील यांनी सेनगाव व कळमनुरी तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. अन बळीराजा ला जास्तीत जास्त मदत मिळून देण्याचा दिलासा ही दिला. सोबत कळमनुरीचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्यासह तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती. तर प्रशासनाला शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्याच्या सूचना ही दिल्या. वसमत तालुक्यातील बोराळा, धामणगाव, नागेशवाडी तर औंढा नागनाथ तालुक्यातील जलालधाबा सेनगाव तालुक्यातील कपडसिंगी,बरडा, पिंपरी, बन, घोरदडी, वझर, सुकळी, मकोडी, धानोरा या गावाना भेटी देऊन बांधावर धाव घेऊन शेतकऱ्यांशी सवांद साधला. Conclusion:तर 25 हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मागणी केलीय. तर शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून शासनच्या माध्यमातून ही मदत मिळून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. एकंदरीत खासदार आज नुकसान ग्रस्त भागात फिरले असल्याने शेतकऱ्यातुन समाधान व्यक्त केले जातेय. मात्र ते ऐन वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आले नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी नाराज झाले होते. एवढेच काय तर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांनी खासदार हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. अन या तक्रारीच्या बातम्या करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याच्या धमकीच्या पोस्ट ही हिंगोली आणि नांदेड हेच दोन्ही जिल्हे एकत्र जोडलेल्या वाटसप गृप वर नांदेड येथून फिरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आता मात्र जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर आता शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळेल या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.