हिंगोली - शहरातील बसस्थानक परिसरात पाच ते सहा महिन्याच्या बाळाला सोडून मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बाळाला ताब्यात घेऊन मातेचा शोध घेतला जातोय. मात्र अद्यापही मातेचा शोध लागलेला नाही. पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या बसस्थानकात सहा महिन्यांचा चिमुकला आढळल्याने खळबळ उडाली. त्यानंतर या चिमुकल्याचे फोटो व त्याच्यासोबत असलेले कपडे पोलीस प्रशासनाच्या वतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. तसेच चिमुकल्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल करून माहिती घेतली जात आहे.
पोलिसांनी केले बाळ घेऊन जाण्याचे आवाहन
चिमुकल्याच्या अंगावरील कपडे व चिमुकल्याचे फोटो पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध सोशल माध्यमावर व्हायरल केले आहेत. बाळ कोणाच्या परिचयाचे असेल तर घेऊन जाण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या चिमुकल्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक 4 मध्ये दाखल केले आहे.
हेही वाचा - लसीकरण मोहीम रद्द नव्हे, २ दिवस स्थगित -आरोग्य विभागाचा खुलासा