ETV Bharat / state

आमदार मुटकुळेंचे वाहन रॉंग साईड, महिला पोलिसांनी आकारला दंड - आमदार तान्हाजी मुटकुळेंच्या वाहनाचे चालान कापले बातमी

आज इंदिरा गांधी चौक येथे चौधरी पेट्रोल पंपाकडे जाताना आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे वाहन चुकीच्या दिशेने वळविल्याने वाहतूक शाखेच्या महिला पथकाने 200 रुपांचे ऑनलाईन दंड आकारले आहे.

चुकीच्या दिशेने वाहन वळविल्याने आमदारांच्याही वाहनाचे काटले वाहतूक शाखेने चालान

author img

By

Published : Jul 14, 2020, 11:02 PM IST

हिंगोली : शहरात वाहतूक शाखेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवून वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची सवय लावली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला मात्र, ऑनलाईन दंड आकारला जात आहे. अशातच आज(मंगळवार) इंदिरा गांधी चौक येथे चौधरी पेट्रोल पंपाकडे जाताना आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे वाहन चुकीच्या दिशेने वळविल्याने वाहतूक शाखेच्या महिला पथकाने 200 रुपांचे ऑनलाईन दंड आकारले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

चुकीच्या दिशेने वाहन वळविल्याने आमदारांच्याही वाहनाचे काटले वाहतूक शाखेने चालान
चुकीच्या दिशेने वाहन वळविल्याने आमदारांच्याही वाहनाचे काटले वाहतूक शाखेने चालान

आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे वाहन (एमएच 38 व्ही 4499) अकोला बायपासकडून इंदिरा गांधी पुतळ्याकडून चौधरी पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी जात होते. दरम्यान, निश्चित केलेल्या वळणावरून वाहन वळविण्याची सूचना कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने दिली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या दिशेने वाहन वळविण्यात आले आणि पेट्रोल पंपावर नेले. त्यामुळे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन अडवून 200 रुपयांचा ऑनलाईन दंड लावला. सदर वाहन हे आमदार तान्हाजी मुटकुळे यांचेच आहे. तर महिला पोलिसाचे नाव सुषमा भाटेगावकर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मागील महिन्यातच आमदार मुटकुळे व भाजप पदाधिकाऱ्याने वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाया थांबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. एवढेच नव्हे तर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात येणाऱ्या करवाईवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे आमदारांच्या वाहनाला ऑनलाईन दंड लावण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.