ETV Bharat / state

सामूहिक विवाह सोहळ्याचा मंडप उडाला; भोजना दरम्यान घडली घटना - लग्न

बोरि शिकारी येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात लग्नविधीची तयारी जोरात सुरू होती. अचानक आलेल्या वावटळ मुळे मंडप ६० ते ७० फूट उंच जाऊन पुन्हा खाली कोसळला.

चानक आलेल्या वावटळ मुळे मंडप ६० ते ७० फूट उंच जाऊन पुन्हा खाली कोसळला
author img

By

Published : May 19, 2019, 8:15 PM IST

हिंगोली- सध्या उन्हाच्या कडाक्यात लग्नसराईची धूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशाच परिस्थितीत अपघाताच्या आणि मंडप उडण्याच्या घटनेतही वाढच होत चालली आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा मंडप उडून वधू आणि वराकडील वऱ्हाडी मंडळी जखमी झाल्याची घटना आज दुपारी बोरी शिकारी येथे घडली. ही घटना भोजन करत असताना घडल्यामुळे जवळपास २५ च्यावर वऱ्हाडी मंडळी जखमी झाली आहेत. तीन दिवसांपूर्वीही सेनगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे देखील मंडप उडून चार ते पाच जण जखमी झाल्याची घटना घडली होती.

चानक आलेल्या वावटळ मुळे मंडप ६० ते ७० फूट उंच जाऊन पुन्हा खाली कोसळला

बोरि शिकारी येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात लग्नविधीची तयारी जोरात सुरू होती. वऱ्हाडी मंडळी भोजन करण्यास बसली होती. अचानक आलेल्या वावटळ मुळे मंडप ६० ते ७० फूट उंच जाऊन पुन्हा खाली कोसळला. मंडप उडताना मंडपामध्ये एकच धावपळ उडाली. अनेकांनी मंडपाचे तंबू पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही ही उपयोग झाला नाही.

भोजन करण्यासाठी बसलेल्यांनी आपला जीव वाचविण्याच्या काकुळतीने मंडपाबाहेर धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंडप खाली कोसळून बरेच जण जखमी झाले. गोंधळ उडाल्याने अन्नाची मोठी नासाडी झाली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी मंडप आणि अन्न पाण्याचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने मंडपाच्या एका बाजूचा पडदा उघडण्यात आला होता. बऱ्याच वऱ्हाडी मंडळीने बांबू पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हवेचा दाब जास्त असल्याने, मंडळींचे प्रयत्नही अपुरे पडले. यागोंधळात वऱ्हाडी मंडळीचे मोबाईल, चप्पल जोडे अस्ताव्यस्त फेकले गेले. त्यामुळे आपले साहित्य गोळा करण्यासाठी बराच वेळ लागला होता.

बोरि शिकारी येथे मात्र अर्धवट उडालेला मंडप पुन्हा उभारण्याचे काम गतीने केले. पाच सामूहिक विवाह सोहळा असल्याने या ठिकाणी बऱ्याच गावातून पाहुणे मंडळी आली होती. मंडप उडाल्याची घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्याने, या विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या आपा-आपल्या नातेवाइकांसोबत अनेकजण संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेत होते. तर जवळचे नातेवाईक घटनास्थळी धाव घेत होते. मंडप उभारल्यानंतर विवाह सोहळा पार पडला.

Intro:सध्या उन्हाच्या कडाक्यात लग्नसराईची धूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशाच परिस्थितीत अपघाताच्या घटना अन मंडप उडण्याच्या घटनेतही वाढच होत चालली आहे. हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मंडप उडून वधू आणि वराकडील वऱ्हाडी मंडळी जखमी झाल्याची घटना आज दुपारी बोरी शिकारी येथे घडली. ही घटना भोजन करतानाच घडल्यामुळे जवळपास 25 च्यावर वऱ्हाडी मंडळी जखमी झाली. मंडप उडताना मंडपामध्ये एकच धावपळ उडाली. अनेकांनी मंडपाचे तंबू पकडण्याचा प्रयत्न केला मात्र काही ही उपयोग झाला नाही. तीन दिवसांपूर्वी सेनगाव तालुक्यात मंडप उडण्याची घटना घडली होती.

Body:हिंगोली जिल्ह्यातील बोरि शिकारी येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात लग्नविधी ची तयारी जोरात सुरू होती. वऱ्हाडी मंडळी भोजन करण्यास बसली होती अचानक आलेल्या वावटळ मुळे मंडप 60 ते 70 फूट उंच जाऊन पुन्हा खाली कोसळला अन काही क्षणात खाली कोसळला. भोजन करण्यासाठी बसलेल्यांनी आपला जीव वाचविण्याच्या काकुळतीने मंडपाबाहेर धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मंडप खाली कोसळून बरेच जण जखमी झाले. गोंधळ उडाल्याने अन्नाची मोठी नासाडी झाली. या मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी मंडप अन अन्न पाण्याचे मोठे नुकसान झाले. उन्हाचा पारा वाढत असल्याने मंडपाच्या एका बाजूचा पडदा उघडण्यात आला होता. बऱ्याच वऱ्हाडी मंडळीने बांबू पकडण्याचा प्रयत्न केला मात्र हवेचा दाब जास्त असल्याने, मंडळींचे प्रयत्नही अपुरे पडले. मंडप उडाल्याने एवढा गोंधळ उडाला की कुणाचा मोबाईल पडला तर कुणाच्या चप्पल जोडे अस्ताव्यस्त फेकले गेले. त्यामुळे आपले साहित्य गोळा करण्यासाठी बराच वेळ लागला होता.
तीन दिवसांपूर्वी ही सेनगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे देखील मंडप उडून चार ते पाच जण जखमी झाल्याची घटना घडली होती.

Conclusion:बोरि शिकारी येथे मात्र अर्धवट उडालेला मंडप पुन्हा उभारण्याचे काम गतीने केले. पाच सामूहिक विवाह सोहळा असल्याने या ठिकाणी बऱ्याच गावातून पाहुणे मंडळी आली होती. मंडप उडाल्याची घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्याने, या विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या आपा - आपल्या नातेवाइकासोबत अनेकजण संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेत होते. जेथे तेथे या मंडप उडण्याची चर्चा सुरू होती. तर जवळचे नातेवाईक घटनास्थळी धाव घेत होते. मंडप उभारल्यानंतर विवाह सोहळा पार पडला.

व्हिज्युअल वरील sulug ने अपलोड केलेत.

व्हिज्युअल बातमीत वापरावेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.