ETV Bharat / state

ऐन दिवाळीत झेंडूची फुले रस्त्यावर; सोयाबीनला फुटले अंकुर

दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या झेंडूच्या फुलाचे क्षेत्र यावर्षी वाढले असले तरीही, तीन ते चार दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसाने झेंडूचे नुकसान झाले आहे. पावसाचा फटका बसलेल्या फुलांचा बाजारभाव पडल्याने खराब झालेली फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे.

झेंडूच्या फुलाचे क्षेत्र यावर्षी वाढले असले तरीही, तीन ते चार दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसाने झेंडूचे नुकसान झाले
author img

By

Published : Oct 25, 2019, 7:50 PM IST

हिंगोली - दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या झेंडूच्या फुलाचे उत्पादन यावर्षी वाढले असले तरीही, तीन ते चार दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसाने झेंडूचे नुकसान झाले आहे. पावसाचा फटका बसलेल्या फुलांचा बाजारभाव पडल्याने खराब झालेली फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच सोयाबीनला पावसामुळे अंकुर फुटल्याने हे पीक वाया गेले आहे.

झेंडूच्या फुलाचे क्षेत्र यावर्षी वाढले असले तरीही, तीन ते चार दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसाने झेंडूचे नुकसान झाले

यावर्षी खरिपाच्या पेरण्यांपासूनच पावसाने हजेरी लावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु, परतीचा पाऊस लांबल्याने सोयाबीन व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच बजारात विक्री होणारी फुले पावसात भिजल्याने शेतकऱ्यांवर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

दिवाळीच्या तोंडावर प्राशासनाने नुकसान झाल्याचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Intro:
हिंगोली- दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या झेंडूच्या फुलाचे क्षेत्र यावर्षी हिंगोली जिल्ह्यात मोठया प्रमाणात वाढलंय. झेंडूला दिवाळीच्या सणाला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्याचे स्वप्न ही पाहिले होते. मात्र तीन ते चार दिवसांपासून संततधार हजेरी लावलेल्या पावसाने घोस च्या घोस लागलेली झेंडूची फुले झोडपून काढली. त्यामुळे बाजारात जाणारी झेंडूची फुले कुणाच्या तरी घराच्या तोरणमाळेला लटकण्या अगोदरच निसर्गाच्या अवकृपेने खराब झाली अन रस्त्यावर फेकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपलीय. हे भयंकर दृश्य दिसून आलंय हिंगोली - ओढा रस्त्यावर. एवढेच नव्हे तर सोयाबीन ला देखील पावसामुळे अंकुर फुटले आहेत.

Body:यावर्षी खरिपाच्या पेरण्या पासूनच अधून - मधून हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली होती. मध्यंतरी दडी मारलेल्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढविली. पुन्हा एकदा हजेरी लावणारे शेतकऱ्यांचा भांड्यात पडलेला जीव बाहेर निघाला. अशा परिस्थितीत पीक काढणीयोग्य झाल्यानंतर परतीच्या पावसाने मात्र शेतकऱ्याचे दिवाळच काढल. हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती सोयाबीन काढणीच्या वेळेस पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली त्यातच जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी झेंडूची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. खरं तर सुरुवातीपासूनच पावसाने साथ दिल्याने झेंडू ही बऱ्यापैकी वाढ न होता यातून डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यात नक्कीच यश येणार होते. मात्र झेंडूच्या फुलांची तोडणी करण्याच्या वेळेतही पावसाने हजेरी लावलीय. बजारत जाऊन विक्री होणारी फुले पावसाने भिजल्याने अक्षरशः रस्त्यावर झोकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपलीय. मोठ्या जड मनाने शेतकरी ही फुले फेकून देत आहेत. तर दुसरीकडे अजूनही सोयाबीनसह तूर अन कपाशी पाण्यात आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून ठेवले त्यातील दाणे गळाले असून त्याला या पावसाने अंकुर फुटलेत. त्यामुळे दोन्ही कडूनही शेतकऱ्याची दिवाळीत तोंडावर दैनाच झालीय. Conclusion:शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अवकृपेने स्वप्न भंगले आहे. दिवाळीत अशी भयंकर अवस्था निर्माण झाल्याने शेकऱ्यांची दिवाळी कडू झालीय. प्राशन स्थरावर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढीच मागणी शेयकऱ्यातून जोर धरत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.