हिंगोली - आतापर्यंत आपण वर्षातून एक वेळा आंबे येणाऱ्या वेगवेगळ्या जातीची आंब्याची झाडे पाहिली आहेत. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील कहाकर बुद्रुक येथे वर्षातून दोन वेळा आंबे येणारे झाड आहे. या झाडाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत असली तरीही विद्यापीठाने अजून या झाडाकडे लक्ष केंद्रित केलेले नाही. या झाडाकडे लक्ष घालून या झाडाची जात विकसित करावी, अशी मागणी झाडाचे मालक संतोष पोपळघट यांनी केली आहे. हे आगळेवेगळे आंब्याचे झाड पाहण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी काकर बुद्रुक या गावी धाव घेतात. मात्र, विद्यापीठाला या आगळ्या वेगवेगळ्या दोन वेळा आंबे येणाऱ्या झाडामध्ये का रस नाही हेच कळायला मार्ग नाही.
हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी कुत्रे करणार मदत ; युएईमध्ये स्निफर कुत्र्यावर प्रयोग
संतोष पोपळघट असे या आंबा मालकाचे नाव असून, त्यांच्या आजीने शेतामध्ये हे आंब्याचे झाड लावले होते. जेव्हापासून या आंब्याच्या झाडाला आंबे लागायला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या वर्षी काही वाटले नाही. मात्र त्याच वर्षी दुसऱ्या वर्षापासून दोन वेळा आंबे लागायला सुरुवात झाल्याने, हा आंबा सर्वांसाठी कुतूहलाचा ठरला आहे. पहिल्या बहार नंतर दुसऱ्या बहाराचे फळ खायला या ठिकाणी बरेच शेतकरी, मित्र मंडळ आवर्जून हजेरी लावत असतात. त्यामुळे या आंब्याची प्रसिद्धी ही सर्वदूर पसरलेली आहे. तर नातेवाईक देखील पोपळघट यांच्याकडे या आंब्याची आवर्जून मागणी करतात. जेव्हा बाजारातील आंबे संपायला सुरुवात होते तेव्हा मात्र या आंब्याला मोहर लागून परिसरात सुंगध पसरतो. त्यामुळे अनेकांची पावले ही आपसूकच या आंब्याकडे वळतात.
वास्तविक पाहता आजच्या घडीला कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या फळाचा झाडांचा शोध लावत आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना पारंपरिक पीक घेण्याबरोबरच फळ वर्गीय झाडातून लाखो रुपयाचे उत्पन्न मिळवता येईल. यातून शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुधारण्यास मदत होईल. सोबतच त्यांच्यावर असलेल्या कर्ज बाजाराचा डोंगरही कमी होईल. परंतु तीन पिढ्यांपासून पोपळघट यांच्या शेतात वर्षातून दोन वेळा आंबे देणारा असलेला वृक्ष का दुर्लक्षीत असावा? शिवाय आता पर्यंत या आंब्याच्या झाडाची जात देखील विकसित करता आलेली नाही. यावर कृषी विद्यापीठाने अभ्यास करून याचे संशोधन करावे या आंब्याच्या झाडाची कलम जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्र भर शेतकऱ्यांना दिली तर खरोखरच या आंब्याच्या झाडांमुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुधारण्यास मदत होईल.
हेही वाचा - प्रसिद्ध अभिनेते जगदीप काळाच्या पडद्याआड
कृषी विद्यापीठाच्या या संशोधनामुळे निश्चितच गावरान आंब्याचा हरवत चाललेला गोडवा हा प्रत्येकाला चा खायला मिळण्यास मदत मिळणार आहे. विद्यापीठातील काही प्राध्यापक मंडळी या आंब्याचे साध्या पद्धतीने कारण सांगत आहेत मात्र अजूनही एकाही प्राध्यापकाने यावर संशोधन करून या आंब्याला वर्षातून दोनदा फळे येण्याचे नेमके कारण तरी काय आहे? याचा अजून तरी शोध लावू शकले नाहीत. आंबा केवळ कुतूहलाचा तेवढाच विषय ठरत आहे. त्याही पुढे अजिबात काही ही नाही. निदान या आंब्याच्या झाडाची जात तरी विकसीत करावी एवढीच मागणी शेतकरी करीत आहे.