ETV Bharat / state

लेक असावी तर अशी! चिमुकली वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शिवते 'चपला-जोडे' - चिमुकली

अंजली शाळेतून येऊन, पाठीवरचे दप्तर बाजूला ठेऊन आपल्या वडिलांना मदत करते. हे चिमुकले हात काम करताना पाहून रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांनाही चिमुकलीचे मोठे कौतुक वाटते.

अंजली
author img

By

Published : Feb 16, 2019, 10:05 AM IST

हिंगोली - आजही अनेक कुटुंबांमध्ये आठराविश्व दारिद्र्य आहे. त्याला कारणेही भरपूर असतात. असेच एक कुटुंब गरिबीत जीवन जगत आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी कुटुंबातील मुलगी शाळेतून परतल्यानंतर पाठीवरचे दप्तर बाजूला ठेऊन आपल्या वडिलांना मदत करते. हे चिमुकले हात काम करताना पाहून रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांनाही चिमुकलीचे मोठे कौतुक वाटते.

वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मोचीचे काम
undefined

अंजली संतोष ईरसे (१०) असे या चिमुकलीचे नाव आहे. अंजलीला ३ बहिणी आणि २ भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. अंजली ही तिसऱ्या क्रमांकाची मुलगी असून ती जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीमध्ये शिकत आहे. अंजलीचे वडील चपला-जोडे बनवण्याचा व्यवसाय आहे. शाळेजवळच रस्त्याच्या कडेला पोते टाकून उन्हापासून बचाव व्हावा, म्हणून छत्री लावली आहे. एका लहानशा पेटीत चपला जोडे बनवण्याचे साहित्य आहे.

या ठिकाणी चप्पल सांदायला, बुटाची पॅालीश करण्यासाठी ग्राहकांची ये-जा सुरू असते. अंजली अगदी लहानपणापासूनच शाळा सुटली, की आपल्या वडिलांचे काम अगदी बारकाईने न्याहळत असे. वडिलांचे पाहून तीने हळूहळू काम करण्यासही सुरुवात केली. शाळा सुटली की ती वडिलांजवळ जाऊन बसते. तिच्यापेक्षा मोठे असलेले व लहान बहीण-भाऊ मात्र शाळा सुटली की थेट घरी जातात. मात्र, अंजली या ठिकाणी काम करते.

अंजली अगदी मन लावून जोडे शिवणे, चप्पल शिवणे, कधी जोड्याला खिळे मारणे, पॅालीश करणे, अशी सर्वच कामे ती करते. त्यामुळे आता ४ पैसेही जास्त येऊ लागले आहेत. चिमुकली काम करत असल्याचे पाहून शक्यतो ग्राहक येथेच धाव घेतात. घरची परिस्थिती सुधारण्यास अंजलीची मदत झाली, असे वडील संतोष यांनी सांगितले. अंजली रोज आपल्या वडिलांना कामात मदत करत असल्याचे परिसरातील दुकानदारही मोठ्या कुतुहलाने सांगतात.

Intro:आजही अनेक कुटुंब आठरा विश्व दारिद्र्य मध्ये जीवन जगत आहेत. गरिबी काही केल्या त्या कुटुंबाचा पाठलाग अजिबात सोडत नाही. त्याला कारण ही भरपूर असतात. असेच एक कुटुंब गरिबीत जीवन जगत असताना, यातून बाहेर पडण्यासाठी त्या कुटुंबातील मुलगी शाळेतून येऊन, पाठीवरचे दप्तर बाजूला ठेऊन आपल्या वडीलाला मदत करते. हे चिमुकले हात काम करताना पाहून रस्त्यावरून ये जस करणाऱ्यानाही या चिमुकलीचे मोठे कोतुक वाटत आहे. मात्र ही चिमुकली आपल्या कामामध्ये एवढी गर्क असते की तिला फक्त समोर कामच दिसते. त्यामुळे ग्राहक ही आवर्जून अंजलीच्या दुकानाकडे धाव घेतात.

Body:अंजली संतोष ईरसे (१०) असे त्या चिमुकलीचे नाव आहे. अंजलीला तीन बहिणी आणि दोन भाऊ, आई वडील असा परिवार आहे. अंजली ही तिसऱ्या क्रमांकाची मुलगी असून ती जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचव्या वर्गात शिकतेय. अंजलीच्या वडिलांचा मूळ व्यवसाय म्हणजे 'मोची' हा आहे. शाळेजवळच रस्त्याच्या कडेला लहानुस पोत टाकून त्यावर एक उन्हापासून बचाव व्हावा म्हणू छत्री लावलेली. अन एका लहानशा पेटित मोची काम करण्याचे साहित्य. हीच अंजलीच्या वडिलांची सर्व संपत्ती. रस्त्यावरच लहानुस मोचाच दुकान असल्याने कुणी चप्पल सांदायला तर कुणी बुटाची पालीस करण्यासाठी ग्राहकांची ये- जा सुरू राहते. अंजली अगदी लहान पणापासूनच शाळा सुटली की, आपल्या वडिलांच्या सावलीला तर कधी छत्रीच्या सावलीला बसून वडील करत असलेले काम अगदी बारकाईने न्याहळत असे. कधी- कधी तर एकाच वेळी जास्त ग्राहक आले तर वडिलांचे पाहून पाहून तीने हळूहळू काम करण्यासही सुरुवात केली. शाळा सुटली की वडीलाजवळ जाऊन बसने हा अंजलीचा जणूकाय रोजचा दिनक्रमच ठरलेला. तिच्याहुन मोठ्या अन लहान असलेले बहीण भाऊ मात्र शाळा सुटली की थेट घरचा रस्ता धरतात. मात्र अंजली अगोदर वडीलाजवळ धाव घेते. दिवसेंदिवस आता वडीलाला अंजलीच्या फारच मदत होऊ लागलिया. त्यामुळे वडील बिनधास्त पणे अंजलीवर दुकान सोडून फेरफटका मारून येऊ लागले. इकडे अंजली मात्र अगदी मन लावून जोडे शिवणे तर कधी, चप्पल शिवणे, कधी जोड्याला खिळे मारणे, पालीस करणे सर्वच कामे एकटीच करू लागली. त्यामुळे आता चार पैसे ही जास्त येऊ लागले.. चिमुकली काम करत असल्याचे पाहून य शक्यतोवर ग्राहक येथेच धाव घेतात. अंजलीच्या कामाचे सर्वच जण कोतुक करतात. मात्र जस जशी पैशाची आवक वाढतेय तशी घरची परिस्तिथी सुधारण्यास मदत झालीया चे वडील संतोषने सांगितले. मात्र कधी मधी दारूचे व्यसन जडलेल्या वडीला मुळे पुन्हा पहिलेच दिवस येऊन ठेपत आहेत. आशा परिस्थितीत अंजली मात्र दुकानावर अगदी मन लावून काम करते मात्र वडीलाचे काम कमी अन फेरफटकाच जास्त झाल्याने, पुन्हा तेच दिवस येऊन ठेपले आहेत.,

Conclusion:आजही उरी शिक्षणाचे स्वप्न बाळगून मोठ्या पोट तिडकीने वडीलाला मदत करण्यासाठी मोची काम करणारी अंजली खरोखरच सर्वांचे आकर्षण ठरतेय. ज्या वयात तिला पेन धरणे अपेक्षित असताना देखील गरिबी मुळे मोची कामाची सुई धरण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तर वडील संतोष म्हणतात की माझ्या कामात अंजलीची खूप मदत होते. मात्र शिकण्याचे खेळण्या बागडण्याचे वय असलेली अंजली आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. त्यामुळे अंजलीची ही धडपड खरोखरच यशाच्या शिखरावर नेऊन पोहचणारी आहे. जर तिला योग्य शिक्षण मिळाले तर.अन्यथा तिला असेंच काम करत तिला जीवन जगण्याशिवाय पर्याय नाही. मात्र अंजली रोजच आपल्या वडीलाला कामात मदत करत असल्याचे परिसरातील दुकानदार ही मोठया कुतुहल्लाने सांगत होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.