ETV Bharat / state

धक्कादायक.. पत्नीवर बलात्कार करण्यासाठी पतीने मित्राला घरात पाठवले, हिंगोलीतील घटना - हिंगोलीत विवाहितेवर बलात्कार

चक्क पतीने स्वतःच्या पत्नीवर बलात्कार करण्यासाठी नराधमाला घरात पाठविले अन दरवाजावर पहारा करत आल्याची धक्कादायक घटना हिंगोली तालुक्यातील सवड येथे समोर आली आहे. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

rape wife
rape wife
author img

By

Published : Jan 22, 2022, 3:46 PM IST

हिंगोली - दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. आता तर या घटनेने फार हद्द ओलांडली आहे. चक्क पतीने स्वतःच्या पत्नीवर बलात्कार करण्यासाठी नराधमाला घरात पाठविले अन दरवाजावर पहारा करत आल्याची धक्कादायक घटना हिंगोली तालुक्यातील सवड येथे समोर आली आहे. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संजय थोरात असे आरोपी पतीचे तर माधव जोगदंड असे नराधमाचे नाव आहे. पतीनेच आपल्यावर बलात्कार करण्यासाठी नराधमाला पाठविल्याचा आरोप करत गुन्हाही दाखल केला आहे.

या प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात पती संजय थोरात अन् माधव जोगदंड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. मात्र या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

यातील आरोपी पती संजय थोरात याला अटक केली आहे तर माधव जोगदंड याचा पथक शोध घेत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघणे यांनी फोनवर दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.