ETV Bharat / state

हिंगोलीत पुन्हा एका वन्यप्राण्याची हत्या करून शिकारी फरार

वन्यप्राण्यांच्या संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तसेच जैवविविधतेचा प्रश्नही मोठ्‌या प्रमाणात निर्माण होत असतानाचा रविवारी हिंगोली तालुक्यातील जामठी खुर्द परिसरात एका वन्य प्राण्याची शिकार करताना शिकारी आढळून आले.

हिंगोलीत पुन्हा एका वन्यप्राण्याची हत्या
author img

By

Published : Sep 9, 2019, 3:06 AM IST

हिंगोली - वन्यप्राण्यांच्या संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तसेच जैवविविधतेचा प्रश्नही मोठ्‌या प्रमाणात निर्माण होत असतानाचा रविवारी हिंगोली तालुक्यातील जामठी खुर्द परिसरात एका वन्य प्राण्याची शिकार करताना शिकारी आढळून आले. वनरक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेताच शिकाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ ठोकला. प्राण्याचे मांस वनविभागाने प्रयोगशाळेत प्राण्याची ओळख पटण्यासाठी पाठवले आहे. दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

हेही वाचा - बैलाने लाथ मारल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; मोहगाव येथील खळबळजनक घटना

रविवारी दुपारच्या वेळेस चार ते पाच शिकारी एका वन्यप्राण्याची शिकार करून मांस वेगवेगळे करत बसले होते, तर काही जण तीक्ष्ण हत्याराने मांस तोडत होते. तोच वनरक्षकांना ही गोष्ट कळताच सर्वजण पळून गेले. घटनास्थळावरून मांस, जाळे आदी साहित्य जप्त केले आहे. संबंधीत मांसाचे पशुवैद्यकीय अधिकाऱयामार्फत शेवविच्छेदन करून यातील काही मांसाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत. अहवालानंतरच हे नेमके कोणत्या वन्यप्राण्यांचे मांस आहे हे सिद्ध होणार असल्याचे वनाधिकारी विश्वनाथ टाक यांनी सांगितले.

हेही वाचा - हिंगोलीत खडीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून एकाचा मृत्यू

आरोपी जरी पळून गेले असतील तरी त्यांच्या दुचाकींच्या नंबरप्लेट चे फोटो काढले असून, त्याद्वारे आरोपीवर कारवाई केली जाणार असल्याचे टाक यांनी सांगितले. सद्या वन्यजीव जंगलात सर्वत्र भटकंती करत आहेत. या जीवांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील जंगली भागात वनसंरक्षक तैनात केले आहेत. तसेच काही खबऱ्यांची देखील व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्याची अजिबात गय केली जाणार नसल्याचे विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.

हेही वाचा - हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर, विक्रेत्यांना फटका

मागील दोन महिण्यापूर्वी देखील ओंढा नागनाथ तालुक्यात अशाच एका वन्यप्राण्यांची शिकार करताना सात ते आठ जण आढळून आले होते. त्यांच्यावर वन्यजीव सरंक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Intro:
हिंगोली- जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या दिवसेंदिवस शिकारीत वाढ होत चालली आहे. आज हिंगोली तालुक्यातील जामठी खुर्द परिसरात एका वन्य प्राण्याची शिकार करताना आढळून आले. वनरक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेताच शिकाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ ठोकला. मांस वनविभागाने ताब्यात घेतले. दोन महिन्यातील ही दुसरी घटना असून, यावरून वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाल्याचे समोर आलेय.

Body:हिंगोली तालुक्यातील जामठी बु परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारी होत असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यामुळे या भागात वनविभाग अतिबारकाईने लक्ष ठेवुन होता. एवढेच नव्हे तर या भागात वनरक्षक व काही खाजगी व्यक्ती देखील सर्वाधिक जास्त फेरफटका मारत लहान सहान हालचालीवर लक्ष ठेऊन होते. आज दुपारच्या वेळेस काही शिकारी वन्य प्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने आल्याची खबऱ्या मार्फत मिळाली. त्यानुसार वनरक्षकाने जामठी बु परिसरात धाव घेतली असता, चार ते पाच जण एका वन्यप्राण्यांची शिकार करून, त्याचे मांस वेगवेगळे करीत बसले होते, तर काही जण तीक्ष्ण हत्याराने मांस तोडत होते. तोच वनरक्षक आणि इतर काही व्यक्तीने घटनास्थळी धाव घेतली तोच सर्वजण पळून गेले. घटनास्थकळावरून तुकडे तुकडे केलेल्यावस्थेत वन्यप्राण्यांचे मांस, जाळे आदी साहित्य जप्त केले. सदरील मांसाचे पशुवैद्यकीय अधिकारयामार्फत शेवविच्छेदन करून यातील काही मांसाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार आहेत. अहवालानंतरच हे नेमके कोणत्या वन्यप्राण्यांचे मांस आहे हे सिद्ध होणार असल्याचे वनाधिकारी विश्वनाथ टाक यांनी सांगितले. मात्र आरोपी जरी पळून गेले असतील तरी त्यांच्या दुचाकींच्या नंबरप्लेट चे फोटो काढले असून, यांबरद्वारे आरोपीवर कारवाई केली जाणार असल्याचे टाक यांनी सांगितले. सद्या वन्यजीव जंगलात सर्वत्र भटकंती करीत आहेत. या जीवांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील जंगली भागात वनसंरक्षक तैनात केले आहेत. तसेच काही खबऱ्यांची देखील व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्याची अजिबात गैय केली जाणार नसल्याचे विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले. Conclusion:मागील दोन महिण्यापूर्वी देखील ओंढा नागनाथ तालुक्यात अशाच एका वन्यप्राण्यांची शिकार करताना सात ते आठ जण आढळून आले होते. त्यांच्यावर वन्यजीव सरंक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल केला असून, त्याना शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. आत या घटनेतही गुन्हा दाखल केला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.