हिंगोली- शहरापासून काही अंतरावर असलेल्या सुराणा नगर भागात तीन दिवसांपूर्वी झालेल्या जबरी चोरीचा छडा हिंगोली ग्रामी पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी जालना जिल्ह्यातील चितळी, पुतळी, विरेंगाव तांडा, पिंप्री डुकरे येथून पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपिंनडून 10 लाख 49 हजार रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिली आहे.
कोल्हापुरे माळू शिंदे( वय -60) बीरेगाव तांडा, बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे (वय - 21) विरेंगाव, माधव कोल्हापुरे शिंदे (वय - 20), विनोद भीमराव तामाने (रा.पुतळी,) जिवा गोपीनाथ जाधव (वय -27, रा. डुकरे पिंप्री) राहुल सर्जेराव धोतरे (रा. रेवकी देवकी) विलास साहेबराव पवार (रा. रामपूरी, जि बीड) भास्कर व्यकंटी झाकणे (वय - 35 विरेंगाव तांडा) सुरेश गंगाराम पवार, मारोती गंगाराम पवार, दीपक नागेश पवार अशी ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. आरोपींनी सुराणा नगर भागातील आर व्ही त्रिमुखे यांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला होता. यामध्ये सोने चांदी मोबाईल व घटनेत वापरण्यात आलेली एक पिकअप, दुचाकी असा दहा लाख एकोन पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ओढ्या नाल्याच्या पाण्यातून प्रवास करून घेतले आरोपीला ताब्यात -
घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपअधीक्षक यतीश देशमुख, सह पोलीस निरीक्षक बळीराम बंडखडके यांच्यासह पथकाने घाव घेऊन पंचनामा केला, आणि पथक रवाना केले. पंथाने मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात धाव घेऊन नदी नाल्याच्या पाण्यातुन प्रवास करून, आरोपीना ताब्यात घेतले. कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे उदय खंडेराय, शिवसांब घेवारे, किशोर पोटे, राजू ठाकूर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे बळीराम बंदखडक, अशोक धामणे आदीनी केली.