ETV Bharat / state

हिंगोली नगरपालिका रस्ते दुरुस्तीच्या लागली कामाला; चिखलफेक आंदोलनाचा घेतला धसका - RPI protest against hingoli nagar panchyat

रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी रिपाइंच्या वतीने 24 ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर चिखलफेक आंदोलन करण्यात येणार होते. मात्र याची दखल घेत नगरपालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

हिंगोली नगरपालिका रस्ते दुरुस्तीच्या लागली कामाला; चिखलफेक आंदोलनाचा घेतला धसका

author img

By

Published : Aug 23, 2020, 6:26 PM IST

हिंगोली- शहरातील बौद्ध नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेकदा तक्रार करून ही हे रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत. सध्या पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी रिपाइंच्या वतीने 24 ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर चिखलफेक आंदोलन करण्यात येणार होते. मात्र याची दखल घेत नगरपालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

हिंगोली नगरपालिकेच्या वतीने शहराचा विकासाच्या बाबतीत अक्षरशा कायापालट केला जात आहे. एवढेच नव्हे तर शहरातील मुख्य रस्ते चकाचक झाले असून स्वच्छतेची देखील तेवढीच काळजी घेतली जात आहे. परंतु शहरातील काही मदमद नगरांमध्ये विशेष करून बौद्ध वस्ती असलेल्या बावन खोली, कमला नगर साहू नगर, आंबेडकर नगर आदी भागातील रस्त्यांची एवढी दयनीयवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याने साधे चालता देखील येत नाही, कित्येक महिला वयोवृध्द या चिखलातून घसरून पडलेले आहेत.

या भागातील लोक नियमित कर भरतात. मात्र रस्ते बनविण्याच्या बाबातीत का पालिका सावत्रपणाची वागणूक देत असावी? असा सवाल आता हे नागरिक करीत आहेत. या भागांमध्ये राहिल्यानंतर खरोखरच एका खेड्यामध्ये राहिल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे चिखलाला कंटाळून या भागातील नागरिक रिपाइंच्या वतीने 24 ऑगस्ट रोजी जिल्हा अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेवर चिखलफेक आंदोलन करणार आहेत. मात्र, तत्पूर्वी पालिकेने रस्त्याची मलमपट्टी सुरू केली आहे. त्यामुळे पालिकेने या आंदोलनाचा धसका घेतला की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.