ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात शासनाचा लवाजमा घेऊन पालकमंत्री करणार टंचाईग्रस्त गावांची पाहणी - hingoli

निदान अंतीम टप्प्यात पालकमंत्र्यानी दुष्काळी दौरा करून प्रशासनाला कायमस्वरूपी त्या-त्या गावात उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे.

दुष्काळ
author img

By

Published : May 9, 2019, 8:20 AM IST

Updated : May 9, 2019, 8:42 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक गावांत हंडाभर पाण्यासाठी २ ते ३ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यात ४५ वर टँकर सुरू करण्यात आले आहे. तर ६०० वर विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बऱ्याचशा गावांत पाणी टंचाईला कंटाळून ग्रामस्थ गाव सोडून गेले आहेत. त्यासाठी आज शेवटच्या टप्यात जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे शासनाचा लवाजमा घेऊन या टंचाईग्रस्त गावांना भेट देणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळाचे दृश्य

प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सर्वोतरी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ प्रस्तावाच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. मात्र, टँकरच्या मंजुरीसाठी आलेल्या फाईली पुढे सरकवण्याचे नावच घेत नाही. हा अनुभव हिंगोली तहसीलमध्ये सर्वांनाच येत आहे.

अनेक गावे टंचाईने होरपळत असताना पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर खरोखरच त्या-त्या गावात प्रशासनाकडून उपाय योजना होतील का? हादेखील प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. गेल्या २ ते ३ वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने यंदा कधी नव्हे ते तलाव कोरडे ठाक पडले आहेत. विशेष म्हणजे जलसंपदा अन् उपविभागीय अधिकारी हिंगोली यांच्या ताळमेळामुळे जिल्ह्यातील हळदवाडी येथील शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही. त्यामुळे त्या तलावाचेदेखील काम दिवसेंदिवस रेंगाळत चालले आहे. हा तलाव झाला असता तर या भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली असती. याकडेही पालकमंत्री कांबळे यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाईदेखील मोठ्याप्रमाणात आहे. अनेक पशुपालक जीवापाड जपलेली गुरे चाऱ्या अभावी कवडीमोल दराने विक्री करीत आहेत. ही परिस्थिती ओंढा नागनाथ परिसरात सर्वाधिक जास्त असल्याने त्या भागात चारा छावणी सुरू करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार संतोष टारफे हे करणार आहेत. मागणी केल्यानंतर खरोखरच चारा छावण्या सूरू होतील का? की हीही मागणी केवळ मागणीच राहते. याकडेदेखील आता ओंढा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अनेक भागात वन्यप्राणी पाण्यासाठी सैरावैरा भटकंती करीत आहेत. जनावरे सांभाळणारे शेतकरी अक्षरशः चिंतातूर झाले आहेत. निदान अंतीम टप्प्यात पालकमंत्र्यानी दुष्काळी दौरा करून प्रशासनाला कायमस्वरूपी त्या-त्या गावात उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्याची मागणी नागरिकातून होत आहे. दुष्काळी दौऱ्यानंतर पालकमंत्री कांबळे हे १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा जवान संतोष चव्हाण यांच्या कुटुंबाची ब्राम्हणवाडा येथे जाऊन भेट घेणार आहेत. पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यात पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. सध्या स्थितीत बऱ्याच गावात हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. काही गावाला तर जानेवारी महिन्यापासूनच टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात ४५ च्या वर टँकर ची संख्या तर ६०० च्या अधिग्रहण झाले आहे. बऱ्याचशा गावात पाणी ।टंचाईला कंटाळून ग्रामस्थ गाव सोडून गेलेत. अन आज शेवटच्या टप्यात जिल्ह्याचे पालकमंत्री दिलील कांबळे हे शासनाचा लवाजम्यासह टंचाईग्रस्त गावांना भेटी देणार आहेत.

Body:हिंगोली जिल्हा हा नाउद्योग जिल्हाम्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्दीस आहे. आता तो पाणी टंचाईने देखील चर्चिला जातोय. जिल्ह्यात आज घडीला 50 गावे तर एवढ्या भयावह स्थितीत आहेत की त्या गावात पाण्यासाठी ग्रामस्थ रात्र- रात्र जागून काढत आहेत. जरी प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सर्वोतरी प्रयत्नशील असले तरी टॅंकरच्या मंजुरीसाठी आलेल्या फाईली पुढे सरकण्याचे नावच घेत नाही. हा खरा अनुभव हिंगोली तहसील मध्ये सर्वानाच येत आहे. वरिष्ठ प्रस्तावाच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. आज गाडीला जिल्ह्यातील अनेक गावे टंचाईने होरपळत असताना, पालकमंतमंत्र्यांच्या भेटीनंतर खरोखरच त्या- त्या गावात प्रशासनाकडून उपाय योजना होतील का? हा देखील प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने यंदा तर कधी नव्हे ते तलाव कोरडे ठाक पडले आहेत. विशेष म्हणजे जलसंपदा अन उपविभागीय अधिकारी हिंगोली यांच्या ताळमेळामुळे जिल्ह्यातील हळदवाडी येथील शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही. त्यामुळे त्या तलावाचे देखील काम दिवसेंदिवस रेंगाळत चालले आहे. हा तलाव झाला असता तर या भागातील शेतकऱ्यांचा काही प्रमाणात पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली असती.या कडेही पालकमंत्री कांबळे यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
जिल्ह्यात पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाई देखील मोठ्याप्रमाणात जाणवत असल्याने, अनेक पशुपालक जीवापाड जपलेली गुरे चाऱ्या अभावी कवडीमोल दराने विक्री करीत आहेत. ही परिस्थिती तर ओंढा नागनाथ परिसरात सर्वाधिक जास्त असल्याने त्या भागात चारा छावणी सुरू करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार संतोष टारफे हे करणार आहेत. मागणी केल्यानंतर खरोखरच चारा छावण्या सूरु होतील का? की ही देखील मागणी केवळ मागणीच राहते या कडे देखील आता ओंढा ना.तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Conclusion:पालकमंत्री दोन जिल्ह्यात मुक्कामी राहणार असून, टंचाईवर प्रशासन काय उपाय योजना करते हे देखील पाहणे ओत्सुकतेचे ठरणार आहे. पाणी टंचाई केवळ मनुष्यजातींनाच नव्हे तर वन्यप्राणी अन गुरांना देखील जाणवत आहे. जिल्ह्यातील बऱ्याच भागात वन्यप्राणी पाण्यासाठी सैरावैरा भटकंती करीत आहेत. जनावरे सांभाळणारे शेतकरी अक्षरशः चिंतातुर झालेले आहेत. निदान अंतिम टप्यात पालकमंत्र्यानी दुष्काळी दोरा करून प्रशासनाला कायमस्वरूपी त्या- त्या गावात उपाययोजना तरी राबवण्याच्या सूचना देण्याची मागणी नागरिकातून होत आहे. भयंकर दुष्काळाची पाहणी करून पालकमंत्री कांबळे हे १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेला जवान संतोष चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित न राहू शकलेले पालकमंत्री आज जवानांच्या कुटुंबाची ब्राम्हणवाडा येथे जाऊन भेट घेणार आहेत. पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दोऱ्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.

गुरांची भटकंती करतानाचे व्हिज्युअल ftp केले आहेत. बातमीत वापरणे
Last Updated : May 9, 2019, 8:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.