हिंगोली - खरीप हंगाम हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने शेतकरीही अहोरात्र परिश्रम करून शेतीची कामे गतीने करून घेत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये हवामान विभागाच्या लावलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील विविध भागात दोन दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे आता शेतीच्या कामांना गती येणार आहे. आज विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणामध्ये अमुलाग्र बदल जाणवत आहे. तर शुक्रवारपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतीची कामे व शहरी ठिकाणी लावण्यात आलेली शेतीउपयोगी साहित्याची दुकाने यांची चांगलीच तारांबळ झाल्याचे दिसून येत आहे तर शेती कामाला देखील ब्रेक लागत आहे. खरिपाची पेरणी ही अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. त्याअनुषंगाने शेतकरी दिवसाची रात्र करत शेतात राबराब राबत आहे. शेतकरी खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. सध्या पाऊस हजेरी लावत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांनी बॅड पाडण्यास सुरुवात केलेली आहे. सोबतच काही शेतकरी हे यंदाच्या वातावरणानुसार बियाण्याची निवड करीत आहेत. बर्याच भागातील शेतकरी भुईमूग आकडे आले आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये भुईमुगाचे क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच सध्याच्या स्थितीमध्ये सोयाबीनचे दर हे गगनाला भिडले आहेत.
सोयाबीन बियाणे खरेदीसाठी गर्दी -
सध्या स्थितीत आठ ते दहा हजार रुपये क्विंटल प्रमाणे सोयाबीन बियाण्याची विक्री केली जात आहे. कृषी विभागही घरचेच बियाणे वापरण्यासाठी वारंवार मार्गदर्शन करत असल्याने शेतकरी खात्यात बियाण्याला पसंती देत आहेत. अशातच गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे शेतकऱ्याजवळ दमडीही उरलेली नाही. त्यामुळे उसनवारी तसेच खाजगी बँका व खाजगी सावकाराकडून खते बी-बियाणे भरण्यासाठी पैशांची जुळवाजुळव शेतकरी करीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी; शेती कामाना येणार वेग - हिंगोलीत अवकाळी
खरीप हंगाम हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने शेतकरीही अहोरात्र परिश्रम करून शेतीची कामे गतीने करून घेत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये हवामान विभागाच्या लावलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील विविध भागात दोन दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे.