ETV Bharat / state

हिंगोलीत मागील ३ दिवसांपासून संततधार; नदी-नाल्याकाठची पिके धोक्यात

author img

By

Published : Aug 16, 2020, 3:17 PM IST

मागील ३ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याचे मोठ संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

हिंगोली पाऊस
हिंगोली पाऊस

हिंगोली - जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, ईसापूर आणि सिद्धेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे येलदरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान, पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या शेतशिवारात पाणी शिरले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

हिंगोलीतील पाऊस स्थिती

जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पावासाचा जोर कायम आहे. माळरानातील शेतीसाठी हा पाऊस लाभदायक असला तरी नदी काठच्या शेतात मात्र पाणी शिरत असल्याने, खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान, मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांचे आणि मजुरांचे हाल सुरू आहेत.

हेही वाचा - सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले चारगड धरण ओव्हरफ्लो; १,४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देखील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर आता वरून सुरू असलेला हा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. पाऊस न थांबल्यास खरीप पिकांचे नुकसान, आणि आरोग्याच्या समस्या अशा दुहेरी संकटाला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे.

हेही वाचा - लोणावळ्यात 24 तासात 128 मिलीमीटर पावसाची नोंद; डोंगर-दऱ्यातील धबधबे प्रवाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.